Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी ‘कधीपर्यंत सहन करायचा अत्याचार?’, बिहारी विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच खेसारी लालची सटकली

‘कधीपर्यंत सहन करायचा अत्याचार?’, बिहारी विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच खेसारी लालची सटकली

देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर कलाकार व्यक्त होताना दिसत आहेत. सिनेसृष्टी कोणतीही असो, पण त्यातील कलाकार हे चालू घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. काही कलाकार हे व्यक्त होत नाहीत, पण काही कलाकारांना बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. असाच एक भोजपुरी अभिनेता आहे, ज्याने एका व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो अभिनेता इतर कुणी नसून भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव आहे. काय आहे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये? चला तर जाणून घेऊया…

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय?
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला व्हिडिओ बिहारच्या पटणा येथील आहे. या व्हिडिओत एक बिहारी विद्यार्थी हातात तिरंगा घेतलेला दिसत आहे. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीला बिहारचे पोलीस वाईट पद्धतीने मारहाण करताना दिसत आहेत. याच व्हिडिओवर नेटकऱ्यांसोबत खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) यानेही आगपाखड करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

खेसारी याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बिहारी प्रत्येक ठिकाणी लाचार आहे… घरातही आणि बाहेरही. पण कधीपर्यंत? कोण उत्तर देणार?” खेसारीच्या या पोस्टला आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, हजारो कमेंट्सही आल्या आहेत. या पोस्टवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

एकाने लिहिले आहे की, “भैय्या जी, हे सरकार नीट जगू देणार नाही. मी पेशाने वकील आहे, तरीही सरकारी नोकरीसाठी भटकत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “बिहार खूपच मागे आहे.” अशा नानाविध प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

खेसारीने त्याच्या ट्वीटमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो पटणाचा आहे, ज्यात तिरंगा घेतलेल्या एका व्यक्तीला पोलीस मारहाण करत आहेत. तसेच, दुसरा फोटो हा यूपीच्या नोएडातील आहे. नुकतेच नोएडाच्या एका सोसायटीतून हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, जिथे नशेत एक महिला काही सुरक्षा अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करताना दिसली होती. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
क्या बात है! घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले धनुष आणि ऐश्वर्या, खूपच खास आहे कारण
जान्हवीच्या मागे धावला बॉयफ्रेंड, तरीही थांबली नाही अभिनेत्री; नेमकं झालंय तरी काय?
मुहूर्त ठरला! ‘पुष्पा २’ बद्दल रश्मिकाने दिली महत्वाची अपडेट, पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा