Wednesday, March 29, 2023

मुहूर्त ठरला! ‘पुष्पा २’ बद्दल रश्मिकाने दिली महत्वाची अपडेट, पोस्ट व्हायरल

 अल्लु अर्जुनच्या ‘पुष्पा द-राइस’ या चित्रपटानी चाहत्यांना वेड लावून ठेवले  होते. या चित्रपटाचे चित्रिकरण आणि डायलॉगनी प्रेक्षकांना भारावून गेले होते. या चित्रपटामध्ये रश्मिका मंदनाच्या ‘सामे’ या गाण्याने तर धुमाकूळच घातला  होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता प्रत्येकाच्या तोंडामध्ये फक्त एकच प्रश्न होता की, पुष्पा2  आपल्या भेटीला कधी येईल?. चाहते खूपच आतूरतेने पुष्पा2 ची वाट पाहत आहेत, आणि आता ही आतुरता लवकरच संपेल कारण  पुष्पा2 ची शुटिंग सोमवार पासून सुरु झाली असल्याचं रश्मिकाने सांगितले आहे, चला तर जाणून घेऊया हे खरच आहे का?

रश्मिकाने शेयर केले ‘पुष्पा 2’ च्या शूटचे फोटो –
देशातील लाखो प्रेक्षक पुष्पा2 ची आतुरतेने वाट पाहत होते पण याचे निश्चित उत्तर कोणाकडेच नव्हते. पण आता हा क्षण लवकरच येणार असल्याचं दिसून येत आहे. रश्मिकाने चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे ती म्हणजे, पुष्पा2 ची शुटिंग (22 ऑगस्ट) पासुन सुरु असल्याचे फोटो तिने शेअर करत चाहत्यांना खूश केले आहे. रश्मिकाने ‘पुष्पा 2’ साठी होणाऱ्या पुजाचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेयर केले आहे ज्यामध्ये देवांचे फोटो आणि पुष्पा2 ची पाटी दिसली आहे.  ज्यामध्ये 22 तारीख आहे. सध्या पुजा झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ  सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत, ज्यामुळे चाहतेही खूपच खूष आहेत. रश्मिका मंदना आणि अल्लु अर्जुन सोबत फहाद फाजिलही चित्रपटात झळकणार आहे. रश्मिकाने पुजाचे फोटो शेयर करत सोबत एक कॅप्शनही दिले आहे लेट्स गो ही पोस्ट स्टोरीलाही ठेवली आहे.

न्यु यॉर्कमध्ये झळकला अल्लु अर्जुन –
अल्लु अर्जुनने 8 तासापूर्वी एक स्टोरी लावली होती ज्यामध्ये तो न्यु यॉर्कमध्ये असल्याचे दिसून येते.या व्हिडीओमध्ये एका स्टेजवर थांबला  आहे आणि मागच्या बाजूला  फलकावर त्याचा फोटो असताना दिसत आहे. त्याने इंडियन डे परेडमध्येही सहभाग केला होता ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. अल्लु अर्जुन सध्या शुटिंग करत नसल्याचे दिसत आहे त्याच्या शुटींगबद्दलचे वेळापत्रक समोर न आल्याचे दिसत आहे.

पुष्पा2 च्या  प्रदर्शनाची तारीख काय असेल?
चित्रपट निर्माताने पुष्पा द रुल या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख कोणता असेल किंवा कधी चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळेल या विषयी आणखी काहीच वक्तव्य दिलेले नाही. पण चित्रपट निर्माता सुकुसारन यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, 2023 पर्यत चित्रपट प्रदर्शित केला जाईल, या वेळेस चित्रपट एकदम दमदार प्रकारे प्रेक्षकांसमोर आणनार आणि ग्रॅड पद्धतीने चित्रपट प्रदर्शित केला जाईल.

हेही वाचा –
कसला तो नाद! सलमानचा टॉवेल ते करिनाचा लेहंगा, आवडत्या कलाकाराच्या वस्तू घेण्यासाठी चाहत्यांनी ओतलापैसा
बिग ब्रेकिंग l प्रसिद्ध टिकटॉक स्टार भाजपा नेता सोनाली फोगाटचे दुखःद निधनराजकारणातुन थेट छोट्या पडद्यावर एंट्री! पंकजा मुंडें झळकणार नव्या भूमिकेत

हे देखील वाचा