Thursday, July 31, 2025
Home कॅलेंडर आराssराssरा खतरनाक! ‘डीजे लगा के गरियाईब’ गाण्याचा रेकॉर्ड; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘परत वाजवा’

आराssराssरा खतरनाक! ‘डीजे लगा के गरियाईब’ गाण्याचा रेकॉर्ड; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘परत वाजवा’

भोजपुरी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार प्रदीप पांडे चिंटू हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. नुकतेच त्याचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामुळे तो सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

त्याचे ‘प्रेम गीत’ या चित्रपटातील ‘डिजे लगाके गरियाईब’ हे गाणे म्युजिक कंपनी वर्ल्ड वाइड रेकॉर्डस भोजपुरी या यू-ट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये प्रदीप पांडेय चिंटू हा एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. प्रदर्शित होता क्षणीच हे गाणे सर्वत्र व्हायरल झाले आहे. तसेच प्रेक्षकांचा या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे.

‘प्रेम गीत’ या चित्रपटातील या गाण्याचे चित्रीकरण अफलातून झाले आहे. यामध्ये चिंटूचा डान्स आणि स्टाईल सगळ्यांना खूपच आवडली आहे. हे गाणे ‘अभिषेक सिंग गोलू’ आणि ‘नीतू श्री’ यांनी त्यांच्या मधुर आवाजात गायले आहे. ‘उमा लाल यादव’ यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. तसेच ‘रजनीश मिश्रा’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणे सगळ्या तरुण वर्गाला भुरळ घालत आहे.

या गाण्यामध्ये चिंटू एक डीजे बाबूच्या रुपात दिसत आहे. या गाण्यात त्याने वेगळीच केसांची स्टाईल, कानामध्ये बाळी, गळ्यात चैन आणि एक शानदार जॅकेट घातले आहे. त्याचा हा लूक प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.

तसेच त्याच्यासोबत असणारी यामिनी सिंग देखील खूप सुंदर दिसत आहे. या गाण्याचे दिग्दर्शन ‘सोनू खत्री’ यांनी केले आहे. ‘कोमल कार्फी’ ह्या या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर ‘भरत शाह’ आणि ‘तेजा चौधरी’ हे हे दोघे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

हे देखील वाचा