Saturday, June 29, 2024

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या नवीन गाण्याची धमाल! एकाच दिवसात मिळाले ७ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव सध्या आपला जलवा दाखवताना दिसत आहे. अशातच आता त्याचे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. त्याचे गाणे रिलीझ होताच जोरदार व्हायरल होत आहे. खेसारीच्या गाण्याचे नाव ‘सजनवा ओपर देखेला फिलिम’ असे आहे. या गाण्याने लाखो व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

‘सजनवा ओपर देखेला फिलिम’ हे गाणे खेसारीने भोजपुरी गायिका मल्लिका अंतरा सिंग प्रियांकासोबत मिळून गायले आहे. याव्यतिरिक्त गाण्यामध्ये त्याच्यासोबत नीलम दिसत आहे. खेसारी आणि नीलमची केमिस्ट्री चाहत्यांचे मन जिंकत आहे.

हे गाणे ‘टीम फिल्म्स भोजपुरी’ या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ झाले आहे. या गाण्याला एका दिवसातच ७ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्याबाबत बोलताना खेसारीने म्हटले की, “हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. हे गाणे एकदा नक्की पाहा. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादानेच आम्ही तुमच्यासाठी चांगले आणि मनोरंजनात्मक गाणे घेऊन येण्यास प्रेरित होतो. त्यामुळे हे गाणे तुम्हीही नक्की पाहा आणि आपल्या मित्रांनाही दाखवा.”

खरं तर ‘सजनवा ओपर देखेला फिलिम’ गाण्याचे लिरिक्स सोनू सुधाकर यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे संगीतकार हे शंकर सिंग आहेत. दुसरीकडे व्हिडिओचे दिग्दर्शक हे आशिष सत्यार्थी, तर पीआरओ रंजन सर्वेश आहेत. या गाण्याचे फोटोग्राफी दिग्दर्शक संतोष यादव आणि ब्रजेश आहेत.

तसं पाहिलं, तर खेसारीची जोडी प्रत्येक अभिनेत्रीसोबत प्रेक्षकांनी खूप आवडते. मात्र, सध्या त्याची जोडी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री पाखी हेगडेसोबत खूप पसंत केली जात आहे. खेसारी आणि पाखीचे दोन गाणी रिलीझ झाली आहेत. यातील एक गाणे ‘बंगलिनिया’ आहे, ज्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. दुसऱ्या गाण्याचे नाव ‘जवानी जर्दा के पान’ आहे. हे गाणेही हिट ठरले आहे.

हे देखील वाचा