जाळ आणि धुर संगट! तीन तासांत दहा लाख हिट्स आणि हजारो कमेंट्स, पाहा खेसारीलाल यादवचं होळीगीत


भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार खेसारी लाल यादव सतत प्रेक्षकांची मने जिंकत असतो. त्याच्या अभिनयाबरोबरच त्याचे गाणेही चाहत्यांना आवडते. त्याची गाणी नेहमी व्हायरल होत असतात. त्याचे होळीचे औचित्य साधून रिलीज झालेले ‘भतार मोर टेंपू के ड्रायव्हर’ हे गाणेही जोरदार व्हायरल होत आहे.

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी यांच्यात चालू असलेला वाद थांबायचे नाव घेत नाहीये. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करित आहेत. याशिवाय खेसारी लाल त्याच्या नवीन गाण्यामुळेही चर्चेत आहेत. कधी त्याचे ‘दुई रुपया’ गाणे व्हायरल होते तर कधी ‘बदल गईली काजल’. आता त्याचे नुकतेच आलेले आणखी एक गाणेही वेगवान ट्रेंड करीत आहे, त्यातील बोल आहेत ‘भतार मोर टेंपू के ड्रायव्हर.’

हे गाणे 19 फेब्रुवारीला रिलीज झाले. अवघ्या 9 तासांतच या गाण्याला 16 लाखाहूनही अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. गाण्याला अवघ्या साडेतीन तासांत 1 दशलक्ष व्हिव्ज मिळाले होते. खेसारी लालच्या आवाजातील या गाण्याचे बोल कुंदन प्रित यांनी लिहिले असून, रौशन सिंग यांनी संगीत दिले आहे. तसेच, गाणे म्युझिक वाइड यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचवेळी, या गाण्याची मुख्य मॉडेल ही सृष्टी पाठक आहे. गाण्यात ती खूप सुंदर दिसत आहे. गाण्यातील तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना खुपच भावला. याशिवाय सन 2021 मध्ये खेसारीलालची सुमारे 26 गाणी रिलीज होणार आहेत. त्याच्या मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे, काही गाणी रिलीज झाली आहेत, तर काही अजूनही रांगेत आहेत.

खेसारी लाल यादवच्या या नवीन गाण्यालाही नेहमी प्रमाणेच प्रेक्षकांकडून चागला प्रतिसाद मिळत आहे. चाहते कंमेट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. राज अहिर नावाच्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे या वर्षाचे सर्वात धमाकेदार होळी गीत आहे’. त्याचवेळी आरती यादव नावाच्या वापरकर्तीने लिहिले की ‘हा गायक केवळ आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे’. त्याचवेळी दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले की ‘हा आपला ट्रेंडिंग स्टार खेसारीलाल आहे’. तसेच ‘पड़ना मत चक्कर में, कोई नहीं है टक्कर में’ असेही तो गंमतीत म्हणाला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.