सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

Bollywood Celebrities And Their First Crushes See Photos Included Shraddha And Madhuri


बॉलिवूड म्हणलं की, त्यामध्ये ग्लॅमरस, हॉटनेस, भन्नाट स्टाईल अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. याच गोष्टी जवळपास सर्वच चाहत्यांना आकर्षित करत असतात. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी अभिनयनाबरोबरच आपल्या सुंदरतेमुळेही चाहत्यांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे. यातील काही कलाकार असेही आहेत, ज्यांची सुंदरता पाहून अनेकजण त्यांच्यावर प्रेम ओवाळून टाकतात. अशाच प्रकारे जसे सामान्य चाहते एखाद्या कलाकाराला आपला क्रश समजतात, तसेच अनेक सिनेकलाकारांचेही क्रश आहेत. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या क्रशबाबत…

परिणीती चोप्रा
बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्राचे नवाब सैफ अली खान या अभिनेत्यावर क्रश राहिले आहे. परिणीतीला करीना कपूरचा पती सैफ खूप आवडतो. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “मला संधी मिळाली, तर मी सैफला किडनॅप करेल.”

अभिषेक बच्चन
आपल्या काळातील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री झीनत अमान ही बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची क्रश होती. अमिताभ बच्चनने झीनत अमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याच चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अभिषेक झीनत अमानला पाहत असायचा. एका मुलाखतीत अभिषेकने खुलासा केला होता की, “झीनत अमान मला खूप आवडायची आणि मी त्यांना पाहून खूप खुश व्हायचो.”

श्रद्धा कपूर
आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरचे बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणजेच ऋतिक रोशनवर क्रश होते. श्रद्धाला ऋतिक खूपच आवडतो. श्रद्धाने सांगितले होते की, ऋतिक रोशन ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटादरम्यान खूप आवडायचा आणि इतकेच नव्हे, तर तिचे त्याच्यावरील क्रश आजही संपलेले नाही. तिच्याकडे ऋतिकच्या फोटोंचे कलेक्शनही आहे.

अर्जुन कपूर
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचे गुड लूक्स मुलींना खूपच भावतात. परंतु असे असले तरीही, अर्जुनचे करीना कपूर खानवर क्रश आहे. अर्जुनने एकदा, दोनदा नाही तर अनेकदा सांगितले आहे की, त्याचे करीना कपूरवर क्रश आहे. त्याला करीना कपूर खानसोबत ‘कि एँड का’ या चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती, त्यामुळे हा चित्रपटही त्याच्यासाठी खास होता.

प्रीति झिंटा
आपल्या स्माईलने लाखो- करोडो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रीति झिंटाचे हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुजवर क्रश होते. प्रीति टॉम क्रुजचा ‘टॉप गन’ चित्रपट रिलीझ होण्यापूर्वीपासून त्याची चाहती आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे, अनिल कपूरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये प्रीतिला टॉम क्रुजला भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी प्रीतिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

रणबीर कपूर
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचे लूक्स आणि अभिनय अनेक मुलींना भावतात. परंतु रणबीर कपूरचे बॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितवर क्रश आहे. रणबीर कपूर माधुरी दीक्षितचा खूप मोठा चाहता आहे. अनेकवेळा त्याने हे सांगितले होते की, माधुरी दीक्षित हे त्याचे पहिले प्रेम होते. इतकेच नाही, तर रणबीर कपूरला जेव्हा माधुरीच्या लग्नाबद्दल समजले होते, तेव्हा तो खूप उदास झाला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.