Monday, June 23, 2025
Home भोजपूरी राकेश मिश्रा-महिमा सिंग यांच्या रोमांसने प्रेक्षकांना लावले वेड, ‘कुँवारे से पवित्तर बानी’ गाणं होतंय जोरदार व्हायरल!

राकेश मिश्रा-महिमा सिंग यांच्या रोमांसने प्रेक्षकांना लावले वेड, ‘कुँवारे से पवित्तर बानी’ गाणं होतंय जोरदार व्हायरल!

भोजपुरी गीतांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भोजपुरी गाणे रिलीज होताच व्हायरल होऊ लागतात. यावरून त्यांची लोकप्रियता सहज लक्षात येऊ शकते. एकीकडे भोजपुरीचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता राकेश मिश्रा त्याच्या होळीच्या गाण्यासाठी चर्चेत असताना, दुसरीकडे त्याची लोकगीतेही बरीच व्हायरल होत आहेत.

असेच एक गाणे म्हणजे ‘कुँवारे से पवित्तर बानी’, ज्याने रिलीज होताच ट्रेंड व्हायला सुरुवात केली. या गाण्याला आतापर्यंत 40 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात भोजपुरी स्टार राकेश मिश्रा महिमा सिंगसोबत रोमांस करताना दिसत आहेत.

गाण्यात मुख्य अभिनेत्री महिमा सिंहची स्टाईल खूप बोल्ड आहे. त्याचबरोबर राकेशही गाण्यात बराच दमदार अभिनय करताना दिसत आहे. ‘कुँवारे से पवित्तर बानी’ हे गाणे भोजपुरी सॉन्ग म्युझिक वाइड कंपनीने, 12 मार्च रोजी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज केले होते. ज्याला अवघ्या 5 दिवसात 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे पवन पांडे याने लिहिले आहे, तर संगीत प्रियांशु सिंग याने दिले आहे.

हे गाणे राकेश मिश्रा-महिमा सिंग अभिनित असून, पंकज सोनी दिग्दर्शित आहे. यासह नृत्य दिग्दर्शन सिंटू मेहता यांनी केले आहे. या गाण्यात ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे, ज्याला पिंटू अरमान सिंगने हँडल केले आहे.

राकेश मिश्राच्या गाण्याला युट्यूबवर खूप पसंती मिळाली आहे. यूट्यूबवर 73 हजाराहून अधिक प्रेक्षकांनी गाण्याला लाईक केले आहे, तर 2 हजाराहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बच्चन कुटुंबाची लेक असूनही राहिली लाईमलाईटपासून दूर, बिग बींनी वाढदिवशी केले थ्रोबॅक फोटो शेअर

-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

-अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार

हे देखील वाचा