पंजाबी सिंगर हार्डी सिंधू त्याच्या आवाजामुळे अनेक लोकांच्या मनात घर करून आहे. नुकतेच हार्डीचे एक नवीन गाणे यूटुबवर आले असून ते जबरदस्त हिट झाले आहे. ‘तितलियां वर्गा’ असे गाण्याचे बोल असून हे गाणे यूटुबवर ट्रेडिंगमध्ये तिसऱ्या नंबर आहे. हार्डी सिंधू सोबत या गाण्यात सरगुन मेहता देखील आहे. या गाण्याला वीस मिलियन पेक्षा जास्त व्हीयूज मिळाले आहेत.
या गाण्याची लोकप्रियता बघता ओरिग्नल हिट गाण्याचे भोजपुरी व्हर्जन देखील करण्यात आले आहे. ‘पता नहीं जी कौन सा नशा करती है’ असे भोजपुरी गाण्याचे बोल आहे. या गाण्याला देखील यूटुबवर मोठ्याप्रमाणावर लोकांची पसंती मिळत आहे. या भोजपुरी व्हर्जन मध्ये रणजित सिंग असून गाण्याला आवाज रंजीत सिंह आणि अंतरा सिंह प्रियंका यांनी दिला आहे.
या गाण्याला यूटुबवर २४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. गाण्याचे बोल सोनू सरगमने लिहिले असून गाण्याला संगीत रोशन सिंगने दिले आहे. पंकज सोनी यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=a7N91YYI2g8