Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

भुलभूलैय्या २: अनाथाश्रमातील मुलांसाठी कार्तिक आर्यनने ठेवले खास स्क्रिनिंग, चित्रपटाच्या यशाचे केले जोरदार सेलिब्रेशन

कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) चित्रपट ‘भूल भुलैया 2’ रिलीज होऊन चार आठवडे उलटूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित, या चित्रपटाने आतापर्यंत 175 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि लवकरच 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीतील हा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. म्हणूनच चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्तिक आर्यनने एनजीओच्या मुलांसाठी खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

एनजीओच्या मुलांसोबतचे कार्तिक आर्यनचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये  कार्तिक प्रथम थिएटरच्या बाहेर आणि नंतर स्क्रीनिंग दरम्यान मुलांसोबत पोज देताना दिसत आहे. इतकेच नाही तर कार्तिक आर्यनने ‘हाय राम’ ही सिग्नेचर स्टेप करताना मुलांचे क्लिक केलेले फोटोही पोस्ट केले आहेत. ‘भूल भुलैया 2’चे निर्माते भूषण कुमार यांनी कार्तिक आणि मुलांसोबत स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्याने अनेक फोटो क्लिकसाठी पोजही दिली.

तत्पुर्वी बुधवार, 15 जून रोजी काही रस्त्यावरील मुलांशी संवाद साधल्यामुळे कार्तिक चर्चेत होता. यातील एका रस्त्यावरच्या मुलांनी ‘भूल भुलैया 2’ ची कथा कार्तिकला सांगितली. मुलांनी खुलासा केला की त्यांनी चित्रपट पाहिला आणि त्यांना भूल भुलैया 2 आवडला. दरम्यान भुलभूलैय्या २ हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या भूलभूलैय्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव, संजय मिश्रा अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. तर २००७ मधील ‘भुलभूलैय्या’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री विद्या बालन तसेच परेश रावल यांनी भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

हे देखील वाचा