सोशल मीडियावर व्हायरल झाला कार्तिक आर्यनचा नवा लूक; तर चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा


आजकाल सोशल मीडियावर सगळेच सक्रिय असतात. यात बॉलिवूड कलाकारांचा वावर तर मोठ्या प्रमाणात असतो. अभिनेता कार्तिक आर्यन हा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने नुकतीच त्याच्या पुढील एका प्रोजेक्टची झलक सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना दाखवली आहे. परंतु मोठ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आज म्हणजेच रविवारी संपणार आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या कोणत्यातरी प्रोजेक्टच्या टिझरची एक क्लिप शेअर केली आहे. त्याने फोटो देखील शेअर केला होता. यामध्ये त्याचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला होता.

कार्तिक आर्यनने ही क्लिप शेअर करून लिहिले आहे की, “किसीने बदमाश को बुलाया कल आ रहा है.” त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या व्हिडिओला‌ आतापर्यंत १७ लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

कार्तिक आर्यनच्या या बोलण्यावरून त्याचे चाहते तर्क लावत आहेत. एका युजरने लिहिले की, “पुढच्या चित्रपटात तो ऍक्शन हीरो किंवा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे का?” जर ही गोष्ट खरी निघाली तर ही पहिली वेळ असेल, जेव्हा कार्तिक आर्यन एका ऍक्शन सीनमध्ये काम करेल. या काळात बॉलिवूडमध्ये सुपरहीरो प्रकारचे चित्रपट खूप कमी बनत आहेत. कार्तिकला अशा हीरोचा किंवा खलनायकाचा रोल निभावताना पाहताना प्रेक्षकांना खूप आवडणार आहे. (Kartik Arayan give information about his upcoming projects to his fans on social media)

कार्तिकने २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ , ‘लुका छुपी’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो लवकरच त्याच्या ‘भूल भूलैया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ‘कियारा आडवाणी’ ही देखील असणार आहे. या सोबतच तो ‘धमाका’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.