Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड भूल भूलैय्या 3 मध्ये कार्तिकसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स

भूल भूलैय्या 3 मध्ये कार्तिकसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स

भूल भूलैय्या 2 मध्ये कार्तिक आर्यनने धमाल आणली होती. तर पहिला भाग अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्यामुळे गाजला होता. आता लवकरच भूल भूलैय्या 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यनने भूलभूलैय्या 3 चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली होती. या चित्रपटात ओरिजनल मंजुलिकाची एन्ट्री होणार आहे. तर मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार ? याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम होता. दरम्यान कार्तिकने हटक्या पद्धतीने मुख्य अभिनेत्रिचे नाव रिलीज केले आहे.

कार्तिक आर्यन सध्या भूल भूलैय्या 3 मुळं चर्चेत आहे. चित्रपटाच्या रीलिज डेट नंतर आता कार्तिकने मुख्य अभिनेत्रीचा खुलासा केला आहे. यावेळी कार्तिकने चाहत्यांसोबत कोडे खेळले ज्याद्वारे चाहत्यांनी स्वतःच उत्तर देत मुख्य अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला.

कार्तिकने आपल्या इंस्टावर पजल स्वरुपात दोन फोटो पोस्ट केले आणि ‘भूल भुलैया 3’ ची मुख्य अभिनेत्रीचे कोण आहे हे ओळखा असे चॅलेंज चाहत्यांना दिले. काही कालावधीनंतर चुकीचं उत्तर येत आहेत. पुन्हा शोधा. आणखी एक फोटो शेअर करत हिंट दिली. अनेकांनी कार्तिकचे चॅलेंज स्विकारत ‘तृप्ति डिमरी’ च्या नावाचा उल्लेख केला.

त्यानंतर कार्तिकने आणखी एक पोस्ट करत ‘तृप्ति डिमरी’ चे नाव मुख्य अभिनेत्री म्हणून रिलीज केले. याआधी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘भूल भुलैया २’ मध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे पुन्हा कियारा दिसणार अशी चर्चा बी टाऊनमध्ये सुरु होती. पण आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

तर कोण आहे ‘तृप्ति डिमरी’ ?

मागिल वर्षी संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनची मोठी चर्चा ऐकायला मिळाली. २३ फेब्रुवारी १९९४ मध्ये जन्मलेली तृप्ती डिमरी उत्तराखंडमध्ये राहणारी आहे. मागील अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडशी जोडलेली आहे. तिने २०१७ मध्ये पोस्टर बॉईज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

त्यानंतर नेटफ्लिक्सवरील २०२० मध्ये आलेल्या बुलबुल चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती. तिने वेबसीरिजमधून अनेकांचं लक्ष वेधलं होतं. २०२२ मध्ये आलेल्या कला, लैला मजनू नावाच्या चित्रपटातही ती दिसली होती. याआधी तिला फारशी लोकप्रियता मिळाली नव्हती, पण संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल चित्रपटातून ती रातोरात स्टार झाली.

author avatar
tdadmin

हे देखील वाचा