इंटरनेटवर या दिवसात एक गाणे चांगलेच गाजत आहे. हे गाणे देश-विदेशात देखील धमाल करताना दिसत आहे. या गाण्याचे नाव आहे ‘कच्चा बदाम’. या गाण्यावर सोशल मीडियावर अनेक रील्स बनवले जात आहेत. यावर अनेक टेलिव्हिजन तसेच बॉलिवूड स्टार्स देखील व्हिडिओ बनवत आहेत. उर्फी जावेद, किकु शारदा, सपना चौधरी, गुरमित चौधरीसोबत अनेक कलाकारांनी या गाण्यावर रिल्स तयार केले आहेत. त्यामुळे हे गाणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
अशातच या गाण्याचा निर्माता भुवन बड्याकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओला टीव्ही अभिनेता नील भट्टाचार्य याने शेअर केला आहे. यात त्याने काळ्या रंगाचा कोट-पँट आणि बूट घातलेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये भुवनला ओळखणे अवघड झाले आहे. त्याच्यासोबत अनेक मुलं-मुली डान्स करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/CaIG36iFXHD/?utm_source=ig_web_copy_link
पश्चिम बंगालमधील वीर भूमी येथे राहणाऱ्या भुबन बड्याकरने ‘कच्चा बदाम’ गायले आहे. सोशल मीडियावर त्याचे हे गाणे चांगलेच व्हायरल झाले आणि रातोरात तो स्टार झाला. त्याच्या गाण्याला एका बंगाली गायकाने गायले नंतर त्याला ओळख मिळाली. कच्चा बदाम गाण्याला हरीयाणवी वर्जन गाण्याकडून एक सिग्नेचर स्टेप मिळाली.
‘कच्चा बदाम’ या गाण्याने लोकप्रियता मिळाल्यानंतर भूबन ने त्याचा हा प्रवास त्याला एका स्वप्नासारखा वाटतोय असे सांगितले. त्याने सांगितले की, “मी आज इथे तुमच्या मध्ये येऊन खूप खुश आहे.” भुबनने यावेळी एक चमकणारे जॅकेट घातले होते. यावेळी सगळ्यांमध्ये त्याने त्याचे कच्चा बदाम हे गाणे गायले.
भुबन बड्याकर हा अत्यंत गरीब घरातील मुलगा आहे. एकेकाळी त्याला त्याच्या कुटुंबाला दोन वेळचे दोन जेवण देखील मिळत नव्हते. परंतु आता त्याच्या कलेच्या जोरावर त्याने नाव पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. मागील आठवड्यात त्याला एका कंपनीने १.५ लाख रुपये आणि रॉयल्टी दिली आहे.
हेही वाचा :
- वडिलांच्या तेराव्याला रवीना टंडनने शेअर केले पंतप्रधान मोदी यांचे पत्र, या गोष्टींचा केला उल्लेख
- दिग्दर्शक साजिद नाडियाडवालासोबत लग्न करण्यासाठी दिव्या भारतीने स्वीकारला होता ‘इस्लाम धर्म’, वाचा त्यांची लव्हस्टोरी
- बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यामुळे झाली होती साजिद नाडियाडवाला आणि दिव्या भारतीची भेट; वाचा रहस्यमयी मृत्यू झालेल्या अभिनेत्रीची कहाणी