Friday, July 5, 2024

‘या’ कारणांमुळे नक्कीच पाहा अजय देवगणचा वायूदलाचे शौर्य सांगणारा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’

अजय देवगनचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रेक्षकांना भारतीय हवाई दलातले शूर अधिकारी विजय कर्णिक यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा १९७१ साली भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धातील सत्य घटनेवर आधारित आहे. या युद्धाच्यावेळी पाकिस्तानने भुजवर हल्ला केला होता. तेव्हा विजय कर्णिक हे भुजच्या हवाई तळाचे प्रमुख होते. पाकिस्तानी सेनेने केलेल्या हल्ल्यात हे विमानतळ संपूर्णपणे नष्ट झाले. विमानतळाच्या जवळच असलेल्या माधापार गावतल्या ३०० महिलांच्या मदतीने विजय कर्णिक यांनी कमी काळातच पुन्हा एकदा हे विमानतळ उभारले. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रटातील संवाद अंगावर शहारे आणणारे आहेत. ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ हा सिनेमा का पाहावा याची पाच कारणं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

https://www.instagram.com/p/CSWcrNsNzJg/?utm_source=ig_web_copy_link

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा सिनेमा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणार आहे. या दिवसांमध्ये सर्वच भारतीयांच्या मनात देशप्रेमाची भावना भरभरून असते. त्यामुळे देशभक्तीपर सिनेमे प्रदर्शित होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. शिवाय या सिनेमाचा ट्रेलर पाहून लक्षात येईल की, देशभक्तीसोबतच या सिनेमात मनोरंजनासाठी भरपूर एलिमेंट आहे. चित्रपटाचे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच लोकांच्या ओठांवर रुळले आहेत, शिवाय ट्रेण्डिंगमध्ये देखील ते टॉपवर आहेत. आजपर्यंत युद्धांवर आधारित जेवढे सिनेमे आले, त्यात हा सिनेमा नक्कीच वेगळा असणार आहे हे नक्की. (bhuj the pride of india movie 5 reason to watch)

https://www.instagram.com/p/CSb80cqI0-0/?utm_source=ig_web_copy_link

१९६२, १९६५, १९७१, १९९९ या वर्षांमध्ये झालेल्या युद्धांवर अनेक सिनेमे आले. या सर्व चित्रपटांमधुन प्रेक्षकांना खऱ्या परंतु माहित नसलेल्या सत्य घटना पाहता आल्या. मात्र हे सर्व चित्रपट बहुतकरून पंजाब, राजस्थान किंवा उत्तर पूर्व सीमांवर झालेल्या युद्धावर आधारित होते. या अनुषंगाने पाहिले तर ‘भुज’ चित्रपटाची कथा नक्कीच युनिक ठरणार आहे. सोबतच भारतीय सैन्यासोबत भारतीय नागरिकांची देखील एक लढाई पाहायला मिळणार असून, खासकरून महिलांचा युद्धात असणारा सहभाग या सिनेमात दिसणार आहे.

‘भुज’ हा कदाचित पहिलाच सिनेमा असेल ज्यात ‘पागी’ लोकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. चीनसोबत झालेल्या युद्धावर आधारित असलेला धर्मेंद्र यांचा ‘हकीकत’ या सिनेमात स्थानिक नागरिकांचे बलिदान खूपच चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले होते. त्यानंतर हाच चित्रपट असेल ज्यात ‘पागी’ लोकांच्या भूमिका आणि त्यांचे साहस, योगदान दाखवण्यात आले आहे. संजय दत्त ‘पागी’ या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. पागी हे वाळवंटातील असे लोकं असतात ज्यांना वाळूवर तयार झालेल्या खुणांवरून अचूक माहिती देण्याचे ज्ञान असते. हे लोकं अनेक गोष्टींबद्दल अचूक माहिती देतात. १९७१ सालच्या युद्धावेळी देखील या लोकांनीच सैन्याला भरपूर माहिती दिली होती. याआधी बॉर्डर सिनेमात थोड्या प्रमाणात या लोकांबद्दल दाखवण्यात आले होते.

युद्धावर आधारित जेवढे सिनेमे आले तेवढे जवळपास सर्वच १/२ अपवाद वगळता हे आर्मीवर आधारित होते. ‘गाझी अटॅक’ हा सिनेमा तेवढा नेव्हीवर बेस होता. मात्र वायुदलाचे शौर्य आणि कर्तृत्व दाखवणारे पाहिजे तसे सिनेमे आलेच नाही. मागच्या यावर्षी आलेला ‘गुंजन सक्सेना’ हा सिनेमा नक्कीच अपवाद आहे. मात्र पूर्ण वायूदलाचे युद्धातील शौर्य दाखवणारा हा पहिलाच सिनेमा आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वायूदलाचे काम त्यांची युद्धातील भूमिका, इतर दोन फोर्ससोबत त्यांचे असलेले कनेक्शन, हे सर्व पाहायला मिळणार आहे. सोबतच ‘हम उस महान छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने मुगलों को घुटनों पर ला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था’ असे दमदार संवाद ऐकायला मिळणार आहेत.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा