Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड बॉलिवूडवर कोरोनाचा कहर! अक्षय कुमारनंतर आता ‘हे’ कलाकारही अडकले कोरोनाच्या विळख्यात

बॉलिवूडवर कोरोनाचा कहर! अक्षय कुमारनंतर आता ‘हे’ कलाकारही अडकले कोरोनाच्या विळख्यात

गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक निर्बंध लावून देखील रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार अडकले आहेत. अनेक कलाकार कोरोना संक्रमित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने सोशल मीडियावरून त्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. आता त्याच्या ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटातील अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला देखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील अभिनेता विकी कौशल याला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने सोशल मीडिया वरून दिली आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे की, “मला कोरोनाची काही लक्षणे आहेत. त्यामुळे मी चाचणी केली, तर माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु मी आता ठीक आहे आणि स्वतःला क्वारंटाईन केले आहे. डॉक्टरांनी दिलेले सगळे नियम मी पाळत आहे. मी व्हिटॅमिन सी, स्टीम आणि माझे जेवण या गोष्टी वेळेवर करत आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्याची चाचणी करून घ्या.”

दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता विकी याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की,”पूर्ण काळजी घेऊनही माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.” पुढे त्याने सांगितले की, “मी सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधे मी वेळेवर घेत आहे. माझी विनंती आहे की, हे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.”

याआधी देखील कोरोनाच्या विळख्यात अनेक कलाकार अडकले आहेत. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा सना शेख, परेश रावल, सिद्धांत चतुर्वेदी, संजय लीला भन्साळी या कलाकारांचा समावेश होतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या कपिल शर्माने केले आपल्या मुलाचे नाव जाहीर, वाचा काय ठेवलंय नाव?

-‘देसी क्वीन’ सपना चौधरीने केले हटके अंदाजात फोटोशूट, सिल्व्हर ज्वेलरीने खुलले सौंदर्य

-‘अरे कोणी तरी अग्निशमन दलाला बोलवा…’, ‘दिल बेचारा’ फेम अभिनेत्री संजना सांघीचे हॉट फोटोशूट पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

हे देखील वाचा