Saturday, July 6, 2024

‘आपल्याला लाज वाटायला पाहिजे’, शारीरिक अत्याचार प्रकरणावर भूमी पेडणेकरने केला संताप व्यक्त

बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनयासोबत इतर गोष्टीत देखील त्यांचा सहभाग दर्शवत असतात. अनेक सामाजिक घटनांवर कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया अनेकदा देताना दिसतात. अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील नेहमीच महिलांविरुद्ध होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत असते. नुकतेच लखनऊ ते मुंबई प्रवास करताना एका २० वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचारची घटना समोर आली आहे. या बाबतीत पुन्हा एकदा भूमी पेडणेकरने तिचा राग व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिचा राग व्यक्त केला आहे.

भूमीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपल्या देशात महिलांविरुद्ध होणारे अपराध आता एखाद्या महामारीप्रमाणे झाले आहेत. आपण दररोज महिलां विरोधात होणारे अनेक गंभीर अपराध ऐकत असतो. शारीरिक अत्याचार, हुंडा या सगळ्या गोष्टींसोबत अनेक महिलांच्या आत्महत्येपर्यंत गोष्टी ऐकतो. लहान मुलींपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत, प्रेमापासून ते रागापर्यंत प्रत्येक गोष्ट ऐकत असतो.” (Bhumi Pednekar angry post on gangrape case in Lucknow mumbai Pushpak express says shame on us)

 

भूमीने पुढे लिहिले आहे की, “हे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपण गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देणार नाही. एवढे कठोर कायदे बनवले पाहिजे की, महिलांसोबत गैरवर्तन करण्याचा कोणी विचार देखील करणार नाही. तरुण असतानाचा महिलांचे अधिकार आणि समानता याबाबत शिकवण दिली पाहिजे. आपले सगळे प्रयत्न महिला आणि सुंदर देश बनवण्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करणे हेच असले पाहिजे.”

शुक्रवारी (८ ऑक्टोबर) लखनऊपासून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका २० वर्षाच्या युवतीवर सामूहिकरित्या शारीरिक अत्याचार करण्यात आले. या आरोपींनी इगतपुरी पोलीस स्टेशनच्या इथे ८ च्या दरम्यान लूट केली. त्यानंतर त्यांनी पतीसोबत असलेल्या एका २० वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा