Saturday, July 6, 2024

बॉलिवूड कलाकार मालदीवमध्ये घालवतायत सुट्ट्या, पण भूमीने दिली ‘या’ पवित्र ठिकाणाला भेट, फोटो पाहिला का?

‘दम लगा के हैशा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकरने खूप कमी कालावधीमध्येच अभिनयात मोठी झेप घेतली आहे. आपल्या अभिनयाबरोबरच समाजामध्ये एक सकारात्मक संदेश गेला पाहिजे याकडे देखील ती विशेष लक्ष देते.  एकीकडे बॉलिवूड कलाकार मालदीवमध्ये आपल्या सुट्ट्या घालवत आहेत. मात्र, भूमीने पवित्र ठिकाणाला भेट दिली आहे. सध्या ती अमृतसरमध्ये तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अमृतसरमधील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने प्रसिद्ध अशा सुवर्णमंदिराला भेट दिली आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, भूमी तलावाच्या दुसऱ्या किनारी उभी आहे आणि ती तेथूनच मंदिराचे दर्शन घेत आहे. यावेळी भूमीने अबोली रंगाचा एक ड्रेस घातला आहे. तसेच तिने डोक्यावर एक गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे. यामध्ये ती अतिशय सुंदर आणि निरागस दिसत आहे.
तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “आशीर्वाद,” असे लिहिले आहे. भूमी अशा पद्धतीने स्वतःच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे, हे पाहून तिचे चाहते देखील खुश आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोवर हार्ट आणि फायर ईमोजी पाठवले आहेत.

भूमीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन लूकमधील फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये तिने एक पांढऱ्या रंगाचा मोठा गाऊन घातला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने घातलेल्या या गाऊनवर जांभळ्या रंगाची फुलं देखील आहेत. भूमीने हा लूक पूर्ण करण्यासाठी मेसी हेअर स्टाईल ठेवली आहे. तसेच हिरव्या आणि लाल रंगाचे कानातले देखील घातले आहेत. तिच्या या फोटोवर देखील अनेकांनी हार्ट ईमोजी पाठवले आहेत.

भूमीच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बाला’, ‘पती, पत्नी और वो’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. तसेच लवकरच ती ‘बधाई दो’, ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याचबरोबर सध्या ती ‘भीड’ आणि ‘भक्षक’ या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋतिक रोशनकडून ‘विक्रम वेधा’च्या ऍक्शन टीमला खास गिफ्ट; आपली परंपरा ठेवली अबाधित

-‘मी तिचे सिनेमे बघत नाही कारण…, म्हणत ‘या’ अभिनेत्री सांगितले अनन्या पांडेचे सिनेमे न बघण्याचे कारण

-जाळ अन् धूर संगटच! मोनालिसाने क्रॉप टॉप ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा, फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा