बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री चित्रपटांसोबतच सामाजिक विषयांवरही त्यांचे मत मांडत असतात. चित्रपटांसोबतच या अभिनेत्री त्यांच्या सामाजिक मतांमुळे आणि सामाजिक कामांमुळे देखील खूप चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. भूमी सध्या तिच्या ‘बधाई दो’ या सिनेमामुळे मीडियामध्ये सतत प्रकाशझोतात आहे. या सिनेमातून एका मोठ्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भूमीच्या करिअरमधील हा दहावा सिनेमा असल्याने तो खूपच खास आहे.
भूमी नेहमीच चित्रपटांच्या निवडीबाबत जरा चुझी आहे. ती एकसारखे सिनेमे न करता वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमानं प्राधान्य देत असते. तिच्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना काही तरी वेगळे नक्कीच पाहायला मिळते. तिला अनेकदा तिच्या चित्रपटांवरून ट्रोल देखील करण्यात आले आहे, मात्र तरीही भूमिका त्याकडे दुर्लक्ष करत तिचे काम करताना दिसते. ‘बधाई दो’ सिनेमातून ‘एलजीबीटीक्यू’ समाजावर आणि त्यांच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भूमीने नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगितले.
हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal
या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “माझ्या करिअरच्या सात वर्षांमध्ये ‘बधाई दो’ माझिया दहावी फिल्म आहे. माझा पहिला सिनेमा ज्या महिन्यात शूट झाला होता, त्याच महिन्यात माझा दहावा सिनेमा शूट झाला. एवढेच नाही तर माझ्या ‘दम लगा के हईशा’ या पहिल्या सिनेमाचे जिथे शूटिंग झाले होते, तिथेच ‘बधाई दो’चे देखील शूटिंग झाले आहे. मी खूपच नशीबवान आहे की, मला चांगल्या पठडीबाहेरील चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. येत्या २७ फेब्रुवारीला माझ्या करिअरआलं ७ वर्ष पूर्ण होत आहे. अजूनही विश्वास बसत नाही. आजही माझ्यात स्क्रिप्टबद्दल खूपच नर्वसनेस असतो, जेवढा पहिल्या सिनेमाच्या वेळी होता.”
पुढे भूमी म्हणाली की, “मी माझ्या चित्रपटांमधून वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करते. चित्रपटांमध्ये खूप मोठी ताकद आहे, कारण त्यांची पोहोच खूप मोठी आहे. चित्रपटांमुळे अनेकांमध्ये बदल घडताना आपण बघतो. मनोरंजनाच्या मार्गातून आम्ही लोकांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करत असतो. मला आपल्या समजत घडणाऱ्या सर्वच गोष्टी विचलित करतात. खास करून महिलांचे शोषण होणाऱ्या घटनांमुळे मी सर्वात जास्त विचलित होते. बलात्काराच्या बातम्यांमुळे तर मला रात्ररात्र झोप देखील लागत नाही.”
भूमी नेहमीच लोकांना पर्यावरणाबद्दल देखील जागरूक करताना दिसते. एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम व्यक्ती देखील आहे. तिला नेहमीच आपण समाजाला काही देणं लागतो हा विचार सतत समाजासाठी लढण्याचे बळ देतो.
हेही वाचा-
- लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये ३५० कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…
- करण जोहरच्या ‘या’ कृतीमुळे संपूर्ण मंगेशकर कुटुंब झाले होते नाराज, स्टेटमेंट काढत विचारले होते अनेक प्रश्न
- ‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी