‘बिग बॉस 17‘च्या घरात सध्या एक रोमांचक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अंकितानं तिच्या घरच्यांसमोर असे म्हटले होते की, मला आंबट खावेसे वाटत आहे. त्यावेळी तिची ती गोष्ट ऐकून तिचे कुटूंबीय चर्चा करताना दिसत होते. आता हे प्रकरण चर्चेत आलं असून त्यात ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरु झाली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता (ankita lokhande) आणि विक्की जैन यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. आता या जोडीच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अंकितानं विक्कीला आपण प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचा रिपोर्ट अजून काही आलेला नाही.पण आता ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिताला मळमळ आणि उलट्यांचा त्रास व्हायला लागला आहे. तसेच आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे. अंकिताला पाळीदेखील आलेली नाही.
अंकिता आणि विक्की जैन हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 14 डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी अंकिताचे नाव सुशांत सिंग राजपूतशी जोडले गेले होते. अंकिता आणि विक्की जैन या दोघांनाही आई-बाबा होण्याची खूप इच्छा आहे. आता जर अंकिता खरोखरच प्रेग्नंट असेल तर त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
Ankita Lokhande confesses being pregnant inside BB17 house
Read – https://t.co/ukurzf3sWn #BiggBoss17 #AnkitaLokhande #AnkitaLokhandeJain #AnkitaLokhande???? #MunawarFaruqui #MunawarIsTheBoss #BiggBoss #BiggBoss17 #BB17— Bigg Boss 17 live (@Biggboss17_live) November 15, 2023
अंकिता लोखंडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्की जैन हे एक व्यावसायिक आहेत. तो अंकिताचा पती आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या जाेडप्यापैकी एक आहेत. ते अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे फाेटाे आणि व्हिडिओ पोस्ट शेअर करतात जे त्यांच्या चाहत्यांना त्यांचे वेड लावण्यासाठी पुरेसे आहे. (big boss 17 Famous actress ankita lokhande tv entertainment actress pregnancy test viral video vicky jain)
आधिक वाचा-
–जेव्हा मीनाक्षी शेषाद्रीने दिला होता सनी देओलसोबत किसींग सीन; म्हणाली, ‘तो खूपच…’
–Amitabh Bachchan CWC 2023 Final: ‘बिग बी’च्या ‘त्या’ ट्विटवर संतापले फॅन्स; म्हणाले, ‘तुम्ही अजिबातच…’