Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड Amitabh Bachchan CWC 2023 Final: ‘बिग बी’च्या ‘त्या’ ट्विटवर संतापले फॅन्स; म्हणाले, ‘तुम्ही अजिबातच…’

Amitabh Bachchan CWC 2023 Final: ‘बिग बी’च्या ‘त्या’ ट्विटवर संतापले फॅन्स; म्हणाले, ‘तुम्ही अजिबातच…’

बॉलिवूडचे शहनशाह म्हणा किंवा मेगास्टार म्हणा, सर्वांचे लाडके ‘बिग बींनी‘ नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारे अमिताभ बच्चन सध्या ‘KBC 15’ होस्ट करण्यात व्यस्त आहेत. एकीकडे ते शोच्या सेटवर धमाल करत असतात. तर दुसरीकडे अभिनेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ‘बिग बींंनी काल क्रिकेटशी संबंधित एक सत्य चाहत्यांना सांगितल्यानंतर सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना फायनल न पाहण्याचे आवाहन केले.

भारताने 2023 क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता 19 नोव्हेंबर रोजी भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेशी होईल. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना क्रिकेट चाहत्यांनी वर्ल्डकप फायनल न बघण्याचा सल्ला दिला आहे.

अमिताभ बच्चन हे एक खरे क्रिकेट प्रेमी आहेत. ते नेहमीच भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देतात. मात्र, त्यांनी एक अशी पोस्ट केली आहे ज्याने त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “मी जेव्हा क्रिकेट सामना पाहत नाही, तेव्हा टीम इंडिया नेहमीच जिंकते.” अमिताभ यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, क्रिकेट चाहत्यांनी त्यांना वर्ल्डकप फायनल न बघण्याचा सल्ला दिला.

 एका यूजरने लिहिले की, ‘सर फायनल मॅच पाहू नका.’ दुसऱ्याने लिहिले, ‘बच्चन सर, घरातच राहा.’ आणखी एका युजरने हिंदीत कमेंट केली की, ‘वर्ल्ड कप फायनलच्या अमिताभ यांना एका दुर्गम बेटावर लॉक करण्याची काहीतरी व्यवस्था करूया.’ अमिताभ बच्चन यांनी या सल्लांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, रविवारी होणाऱ्या वर्ल्डकप फायनलमध्ये ते सामना पाहणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (why did cricket fans tell The King of Bollywood amitabh bachchan that you shouldnt watch the cwc world cup final)

आधिक वाचा-
‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ
जेव्हा मीनाक्षी शेषाद्रीने दिला होता सनी देओलसोबत किसींग सीन; म्हणाली, ‘तो खूपच…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा