Tuesday, March 5, 2024

पुर्व बिगबाॅस कंटेस्टंट मनीषा राणीची बिघडली तब्बेत, ‘या ‘ कारणाने केलं हाॅस्पिटलमध्ये ऍडमिट

आजकाल सेलिब्रिटींच्या आजारी असण्याच्या बातम्या खुपंच वाढल्या आहेत. मध्यंतरीच श्रेयश तळपदेला अचानक दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. कालंच श्रेयश त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आजारपणाबद्दल बोलला. आता अजुन एका सेलिब्रिटीबद्दल अशी बातमी येत आहे. ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरील बिग बॉस 2 मधुन पुढे आली होती. बिग बॉस 2ओटीटी फेम मनीषा राणी सध्या छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय डान्स शो ‘झलक दिखला जा 11′(Jhalak Dikhla ja 11) मध्ये दिसत आहे.नुकतेच मनीषाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.काल रात्री मनीषा राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या बिग बॉस फेम मनीषा राणीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मनीषाला झाली अन्नातून विषबाधा
अन्नातून विषबाधा झाल्याने मनीषा राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या हातात ड्रिप लावलेल्या दिसत आहेत. मनीषाचे(Manisha Rani) फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले. फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमचा रोजचा संघर्ष मला माहीत आहे. ‘झलक दिखला जा’साठी तुम्ही तुमचे बेस्ट देत आहात, पण तुमची शारीरिक ताकद कमकुवत आहे. माय स्ट्राँग गर्ल मनीषा. तुम्ही लवकर तंदुरुस्त व्हा.

व्हिडिओ शेअर करत दिले हेल्थ अपडेट
फॅन्सने अशा पोस्ट केल्यामुळे तब्बेतीत सुधार येताच अभिनेत्रीने चाहत्यांना दिलासा देणारा व्हिडियो शेअर केला आहे.’बिग बॉस’ फेम मनिषाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मनीषा तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल सांगत आहे. मनीषा म्हणते, ‘मी ठीक आहे, मला अन्नातून विषबाधा झाली होती, पण मी आता ठीक आहे. काळजी करू नका, मला माहित आहे तूमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव यु ,मित्रांनो.’

‘बिग बॉस’च्या(Big Boss) माध्यमातून झाली लोकप्रिय
सलमान खानच्या(Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये सहभागी झाल्यानंतर मनीषा राणीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मनीषाला शोची सेकंड रनर अप घोषित करण्यात आले होते. बिगबाॅस 2 पासुनंच मनीषाचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत, तिचे इंस्टाग्रामवर 10.9 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मनीषा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच रील, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हे देखील वाचा