Friday, March 14, 2025
Home मराठी आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

मराठी बिग बॉसचे चौथे पर्व संपून जवळपास १० दिवस पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही या शोच्या चर्चा रंगताना दिसत आहे. या शोचे जेतेपद अक्षय केळकरने पटकावत अनेक मोठमोठ्या दावेदार असणाऱ्या कलाकरांना मागे टाकले. यात अपूर्व नेमळेकर, किरण माने, आरोह वेलणकर आदी अनेक मोठी नाव होती. यातलेच एक नाव म्हणजे आरोह वेलणकर. आरोह बिग बॉसच्या अंतिम फेरीच्या आदी घरातून बाहेर पडला. त्याने या शोच्या दुसऱ्या पर्वात देखील तो स्पर्धक म्हणून सहभागी होता. या शोमध्ये पुन्हा त्याला या पर्वात यायची संधी मिळाली, मात्र यावेळेसही त्याचे जेतेपद हुकले. अशातच आरोहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे सध्या तो चांगलाच गाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

आरोह वेलणकरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्यासाठी मागील ४५ दिवस शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या खूप अवघड होते. यावेळेस तर बिग बॉसच्या घराने माझ्या सर्व मर्यादांची परीक्षाच घेतली. त्यातून मी आता बरा होत असून सावरत आहे. मी दोन वेळा अंतिम फेरीतमध्ये पोहोचलो. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. यात मात्र मी एक चांगला व्यक्ती म्हणून प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनात स्थान मिळवले आहे. रियॅलिटी शोची ही कमाल आहे. आता अभिनेता म्हणून मी २०२३ मध्ये येणाऱ्या माझ्या नवीन प्रोजेक्टची वाट बघत आहे.” यासोबतच त्याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

तत्पूर्वी आरोह एक लोकप्रिय अभिनेता असून त्याने अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. रेगे या चित्रपटासाठी आरोहला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे त्याला ‘घंटा’ या मराठी चित्रपटात काम मिळाले. त्यानंतर तो ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेत देखील दिसला होता. बिग बॉसमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिन्मय मांडलेकरने हिंदी चित्रपटांना नकार देण्यामागचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये…’
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ज्युलियन सँड्स अमेरिकेमध्ये हायकिंग करताना बेपत्ता

हे देखील वाचा