Friday, March 29, 2024

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ज्युलियन सँड्स अमेरिकेमध्ये हायकिंग करताना बेपत्ता

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ज्युलियन सँड्सबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘अ रूम विद अ व्यू’सोबत अनेक ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता ज्युलियन सँड्स मागील काही दिवसांपासून दक्षिण कॅलिफोर्निया मधील ‘के’ पर्वतरांगेमधे हरवला आहे. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ज्युलियन हा अमेरिकेतील पर्वतरांगेमधे हायकिंगसाठी गेला होता. त्यांनी हे देखील सांगितले आहे की, तो मागच्या आठवड्यात शुक्रवारपासून माउंट बाल्टी येथून बेपत्ता आहे.

ज्युलियन सँड्सचा तपास लावण्यासाठी शोध आणि बचाव दलाची टीम सेन गॅब्रियल माऊंटनमध्ये शोध मोहीम चालू केली आहे. मात्र शनिवारी इथे झालेल्या हिमस्खलनामुळे या मोहिमेला मधेच थांबवावे लागले आहे. यामध्ये फक्त जमीवरून जी शोध मोहीम चालू होती तीच थांबवली गेली असून, हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या साहाय्याने अजूनही शोध चालूच आहे. दक्षिणी कॅलिफोर्नियामध्ये वादळांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून यामध्ये अजून दोन हायकर्सचा मृत्यू झाला आहे.

ज्युलियन सँड्सने ना केवळ चित्रपटांमध्ये नाही तर टीव्ही मालिकांमध्ये आणि ड्रामा सिरीजमध्ये देखील काम केले आहे. ज्युलियन १९८५ साली दिग्दर्शक जेम्स आइवरी यांच्या ब्रिटिश रोमान्स असलेल्या ‘अ रूम विद अ व्यू’ मध्ये हेलेना बोनहम कार्टरसोबत दिसला होता. तर १९८९ साली आलेल्या ‘वॉरलॉक’, १९९० च्या ‘अर्चनोफोबिया’, १९९१ च्या ‘नेकेड लंच’, १९९३ ‘बॉक्सिंग हेलेना’ आणि १९९५ साली आलेल्या ‘लीविंग लास वेगास’ चित्रपटांमध्ये त्याने केलेल्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा करण्यात आली होती.

तत्पूर्वी सध्या सुरु असलेल्या या शोध कार्यामध्ये अजून कोणतेही विघ्न न येता ते लवकर यशस्वीरित्या पूर्ण व्हावे अशीच सर्वांची इच्छा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकता कपूर लवकरच तिच्या खास अंदाजमध्ये करणार ‘या’ सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा?

‘भोला’नंतर पुन्हा ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार अजय आणि तब्बूची सुपरहिट जोडी

हे देखील वाचा