Saturday, June 29, 2024

बिग बॉस फेम उर्फी जावेदच्या एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी विचारताय, ‘कपडे उंदरांनी कुरतडले का?’

बिग बॉस ओटीटी सुरु झाल्यापासून खूपच चर्चेत आले आहे. बिग बॉसच्या या ओटीटी पर्वात अनेक ओळखीचे आणि अनोळखी चेहरे पाहायला मिळत आहे. काही चेहऱ्यांना ओळख होती मात्र कमी प्रमाणात. याच शोमधील अशीच एक स्पर्धक म्हणजे उर्फी जावेद. टेलिव्हिजन अभिनेत्रीला असणाऱ्या उर्फीला बिग बॉसने खूपच कमी वेळात अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. सोशल मीडिया सेन्सेशन असणारी उर्फी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर देखील तिची लोकप्रियता कमी झालेली नाही.

अनेकदा उर्फी तिच्या स्टाईलमुळे आणि तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते. मात्र यावेळी उर्फी तिच्या कपड्यांमुळेच ट्रोल होत आहे. फक्त एकाच आठवड्यात बिग बॉसमधून बाहेर पडणाऱ्या उर्फीचा एअरपोर्ट लूक पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे.

नुकतेच उर्फीला एअरपोर्टवर स्पॉट केले गेले, यावेळी तिचा अवतार पाहून बघणाऱ्यांचे तोंड उघडेच राहिले. उर्फीला पाहून एअरपोर्टवर पॅपराजीनीं चांगलीच गर्दी केली. मात्र यावेळी तिचा विचित्र लूक सध्या चांगलाच गाजत आहे. उर्फीने जीन्स, रग्ड डेनिम क्रॉप शर्ट घातला होता. मात्र तिचा डेनिम शर्ट असा होता ज्यातून तिची ब्रा स्पष्ट दिसत होती. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिचा हा लूक पाहून यूजर्सने कमेंट्स केल्या आहेत. कोणी लिहिले की, ‘उरलेला शर्ट उंदरांनी कतरला का?’, कोणी लिहिले, ‘ही अशी कोणती फॅशन आहे?’, ‘अरे यार कोणाकडे जुने कपडे असतील तर या गरीब लोकांना द्या’ अशा अनेक कमेंट्स करत तिच्या लुक्सची मजा घेतली जात आहे.

याआधी देखील उर्फीने डस्टबिन बॅग पासून तयार केलेला एक ड्रेस घालत सर्वांना चक्रावून सोडले होते. २४ वर्षीय उर्फीने तिच्या करियरची सुरुवात ‘बडे भय्या की दुल्हनिया’ मालिकेतून केली. त्यानंतर ती ‘चंद्रनंदिनी’, ‘मेरी दुर्गा’, ‘सात फेरो की हेरा फेरी’, ‘जीजी माँ’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या केहलता हैं’, ‘कसोटी जिंदगी की’ आणि ‘बेपनाह’ या मालिकांमध्ये दिसली.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

हे देखील वाचा