Monday, July 1, 2024

‘चौक’चा जबरा फॅन! बारामतीच्या एका पठ्ठ्याने संपुर्ण थिएटर बुक करून एकट्यात बघितला चित्रपट; म्हणाला…

चौक’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता दोन आठवडे झाले आहेत, तरीही त्याची क्रेझ वाढतच आहे. कारण, ‘चौक’च्या एका फॅनने अशी एक गोष्ट केली जी बघून सगळेच थक्क झाले आहेत. चौक चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या ‘चौक’ निस्सीम चाहतेही मिळाले आहेत. अशात सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये एक हटके घटना घडली आहे, ज्यामुळे ‘चौक’ चित्रपट  पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामतीच्या एका तरूणाने ‘चौक’ बघण्यासाठी आख्खं थिएटरच बुक केलं आणि पठ्ठ्याने एकट्याने या चित्रपटाची मजा घेतली… आहे ना थक्कं करणारी गाेष्ट! काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

बारामतीच्या शुभम दळवी या अवलियाने बार्शी येथील गोल्डन सिनेमॅक्स थिएटरमध्ये एक शो बुक केला आणि एकट्याने बघितला. या चित्रपटात शुभमची छोटी भूमिकाही आहे. त्याला स्वतःला मोठ्या स्क्रिनवर स्पेशल शो बघायचा होता, त्यामुळे त्याने शोच बुक केला आणि चित्रपटाची मजा घेत तो एकट्याने बघितला. शुभम म्हणतो की, “दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांची चित्रपट काढण्यामागची तळमळ मी बघितली आहे, असं काहीतरी हटके करून मला दया दादाला सरप्राईज द्यायचे होते, त्यामुळे मी एकट्याने स्क्रिन बुक करत चौक बघितला.” शुभमच्या या अवलियापणाची सगळीकडेच चर्चा होत आहे.

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. यापूर्वी देवेंद्र यांनी ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘बबन’, ‘रेगे’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’, हिंदीतील ‘तान्हाजी’ या चित्रपटांमध्ये म्हत्वाची भूमिका साकारली आहे. यामुळे आता दिग्दर्शनातील त्यांची जादू पाहण्यासारखी आहे.(Big fan of ‘Chowk’! A person from Baramati booked the entire theater and watched the movie alone)

अधिक वाचा-
हाॅटनेसचा कहर! शहनाझ गिलने समुद्र किनारी केले फाेटाेशूट
खळबळजनक! अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी; ‘ही’ अत्यंत मौल्यवान वस्तू चोरांनी केली लांबपास

हे देखील वाचा