Friday, December 8, 2023

खळबळजनक! अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी; ‘ही’ अत्यंत मौल्यवान वस्तू चोरांनी केली लांबपास

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्री आहे. जसजसे तिचे वय वाढत चालले आहे, तसतशी ती आणखी सुंदर दिसत आहे. फिटनेस हे नाव घेतले की, सर्वांच्या डोळ्यांसमोर फक्त शिल्पा शेट्टी हेच नाव उभा राहते. तिची फिटनेस बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. नुकतीच शिल्पाच्या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.

शिल्पाच्या (Shilpa Shetty) घरी चोरी झाली आहे. मात्र, हे प्रकरण काही दिवसांपुर्वी घडले आहे. त्या संबंधीचे अपडेट पोलिसांनी आज माध्यमांना दिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यावर झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

अभिनेत्री शिल्पा परदेशात असल्याने घरातून नेमके कोणती वस्तू चोरीला गेले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “शिल्पाच्या ‘किनारा’ बंगल्याच्या हाऊसकीपिंग मॅनेजरने चोरीची तक्रार पोलिसांकडे केली तेव्हा ही घटना उघडकीस आली.” तसेच, पोलिसांनी चोरांकडून शिल्पाच्या घरातून चोरी केलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.

तक्रारीनुसार मे महिन्याच्या अखेरीपासून शिल्पाच्या बंगल्यात काही दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळी, शिल्पा 24 मे रोजी तिच्या कुटुंबीयांसह परदेशात गेली होती. गेल्या काही दिवसांपुर्वी शिल्पाच्या घरातील महागड्या वस्तूंची चोरी झाली होती. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणामुळे आता शिल्पा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

शिल्पाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटांनंतर शिल्पा लवकरच OTT वर धमाल करताना दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसिरीजमध्ये ती झळकणार आहे. या मालिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय हे देखील भूमिका साकारताना दिसणार आहेत. चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Actress Shilpa Shetty’s house was stolen, police handcuffed the thieves)

अधिक वाचा-
जमलं रे जमलं! प्रथमेश लघाटेनं अखेर रिलेशनशिपची दिली कबुली; म्हणाला…
पुण्यातून अभिनयाचे धडे गिरवणारे मिथुन चक्रवर्ती आहे तब्बल 292 कोटींच्या संपत्तीचे मालक, भावाच्या मृत्यूनंतर सोडला होता नक्षलवाद

हे देखील वाचा