Friday, April 19, 2024

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन! कलाविश्वातून अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

मोठी बातमी समोर येत आहे. तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर भागात बुधवारी (०८ डिसेंबर) भारतीय वायुसेनेच्या एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, या अपघातात बिपिन रावत यांचे निधन झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या १४ पैकी १३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांची ओळख डीएनए टेस्टने होणार आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही घटनास्थळी पोहोचले आहेत. बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “धक्कादायक आणि विनाशकारी नुकसान. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या सहृदय संवेदना. जनरल बिपिन रावत यांची भेट घेतल्याचा मला सन्मान वाटतो. ओम सद्गती.”

अभिनेता रणदीप हुड्डानेही बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “संरक्षण सेवा प्रमुख #BipinRawat जी, मॅडम रावत आणि इतर ज्यांनी दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात आपले प्राण गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना मनापासून संवेदना… ओम शांती.”

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तिने “आरआयपी जनरल बिपीन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि इतर ११… कुटुंबाप्रती संवेदना. ओम शांती,” अशा आशयाचे ट्वीट केले आहे.

याव्यतिरिक्त अभिनेत्री रवीना टंडननेही या अपघातात निधन पावलेल्या व्यक्तींसाठी शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत तिने लिहिले की, “CDS जनरल #BipinRawat, श्रीमती मधुलिका रावत आणि इतर ज्यांचे दुःखद हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या मनापासून संवेदना.”

अनेक कलाकार बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा