Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड फिनालेच्या अगोदर ‘बिग बॉस १५’मध्ये आला मोठा ट्विस्ट, उमर रियाझ झाला बेघर?

फिनालेच्या अगोदर ‘बिग बॉस १५’मध्ये आला मोठा ट्विस्ट, उमर रियाझ झाला बेघर?

‘बिग बॉस १५’चे सर्वात मोठे आणि चकित करणारे एव्हिक्शन समोर आले आहे. होय! उमर रियाझला (Umar Riaz) आतापर्यंत या सीझनमधील सर्वात मजबूत स्पर्धक म्हणून पाहिले जात होते. परंतु आता तो शोमधून बाहेर पडला आहे. उमरचा भाऊ असीम रियाझ (Asim Riaz) आणि हिमांशी खुराना (Himanshi Khurana) यांच्या ट्वीटवरून याचे संकेत मिळाले आहेत. असीम आणि हिमांशी खुरानाच्या सोशल मीडियावर आलेल्या लेटेस्ट पोस्टने चाहत्यांना धक्काच बसला आहे.

काय म्हणाला असीम?
या ट्वीटनंतर सोशल मीडियावर उमरच्या समर्थनार्थ युजर्सचा पूर आला आहे. उमरला शोमधून काढून टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. याचे कारण म्हणजे असीमने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे, “चांगला खेळलास @realumarriaz लव्ह यू ब्रदर.” (big twist in bigg boss 15 before the finale did umar riaz become homeless from the show)

हिमांशीने निर्मात्यांना फटकारले
असीम रियाझने फार काही सांगितले नाही, पण त्याची गर्लफ्रेंड आणि ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक मैत्रीण हिमांशीने निर्मात्यांना चांगलेच फटकारले. तिने लिहिले, “त्यांना जे करायचे आहे ते ते करतातच… वोट करा आणि काढून टाका. हे करून तुमचे मानसिक आरोग्यही खराब करा.” उत्तम खेळला उमर @realumariaz.”

झाला होता नॉमिनेट
सुरुवातीला उमर रियाझ प्रतीक सहजपालसोबत झालेल्या वादामुळे नॉमिनेट करण्यात आला होता. एका टास्कदरम्यान प्रतीकने उमरवर पाणी फेकल्याने, दोघांचे भांडण झाले. त्यावेळी बिग बॉसने उमरला त्याच्या वागणुकीबद्दल फटकारले आणि त्याला नॉमिनेट करून निर्णय प्रेक्षकांच्या हातात सोडला होता. कदाचित त्याला पुरेशी मते न मिळाल्याने त्याला शोमधून काढून टाकण्यात आले असावे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा