Thursday, January 2, 2025
Home टेलिव्हिजन चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…

चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…

बिग बॉस‘ फेम पारस छाबरा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याचे माहिरा शर्मासोबत ब्रेकअप झाले. मात्र, त्यांनी अद्याप यावर मौन सोडलेले नाही. तो सध्या त्याच्या आईसोबत वृंदावनमध्ये रहात आहे. अशात आता एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले आहे की, चिंतेच्या समस्येमुळे त्याचे वजन वाढले आहे. त्यामुळे अनेक प्राेजेक्ट त्यांच्या हातातून गेले आहेत. अशात अभिनेता वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.

माध्यमाशी बातचित करताना पारस छाबरा (paras chhabra) म्हणाला, ‘माझ्या वजनामुळे मला अनेक प्रोजेक्ट्स नाकारावे लागले. मात्र, आता मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानात उतरलो आहे. काही महिन्यांपूर्वी माझे वजन 125 किलो होते, जे माझ्या सामान्य वजनापेक्षा खूप जास्त होते. त्यामुळे मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि नंतर ब्लड प्रेशरचा त्रासही सुरू झाला. अशा परिस्थितीत मला जास्त व्यायाम करता येत नव्हता. पण मी हळूहळू ट्रेनरच्या मदतीने माझा स्टॅमिना वाढवला आणि आता माझे वजन 108 किलो झाले आहे.

पारस पुढे म्हणाला, ‘माझे वाढलेले वजन दिसत नव्हते. कारण, माझी उंची 6 फूट आहे. मात्र, मला ते जाणवत होतं. मी नेहमीच 90च्या आसपास असतो. पंजाबी असल्यामुळे मी कधीच फार हाडकुळा नव्हतो. मला जेवणाची खूप आवड आहे.  अशात माझे वजन 90 पेक्षा जास्त झाले. पण हे वजन मी लवकरच कमी करणार आहे.’ यादरम्यान पारस म्हणाला की, ‘तो लवकरच पडद्यावर परतणार आहे, ‘माझ्याकडे काही ऑफर आहेत, त्यापैकी तीन टीव्ही शोच्या आहेत आणि दोन वेब सीरिजच्या आहेत. पण माझ्यासाठी सर्वात रोमांचक ऑफर म्हणजे शो होस्ट करणे.’

अलीकडेच सलमान खानने पारससाठी म्हटले होते की, ‘बिग बॉस 13’मध्ये अभिनेत्यावर संतापल्याने मला पश्चाताप होत आहे. यावर पारस म्हणाला, ‘मी खूप आनंदी आहे की सलमान सर, ज्यांच्यावर मी खूप प्रेम करतो, ते या शोमधील भांडणाबद्दल उघडपणे बोलले. मला कधीही त्या ठिकाणी भांडण करायचे नव्हते. मी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्येही भाग घेतला होता, जिथे सलमान सर माझ्यासाेबत खूप नम्रपणे वागले. सलमान सरांचे हृदय खूप मोठे आहे आणि त्यांच्या मनात इतरांबद्दल वाईट भावना नाही. ते कोणाशीही वैर ठेवत नाही आणि जेव्हा मारामारी झाली तेव्हा ती मुद्दाम झालेली नव्हती. हाेऊन गेली हाेती, पण असाे जे झाले ते झाले. (bigg boss 13 fame paras chhabra lost 17 kgs actor says he was 125 kgs had developed breathing problem)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Vindu Dara Singh Birthday: सुरुवातीच्या काळात सलमान खानसोबत काम केल्याने वडिलांसारखी ओळख निर्माण करता आली नाही

इतक्या वर्षानतर अखरे आयुष्यमानने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा; म्हणाला, ‘चित्रपटांशिवाय जगू शकतो पण…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा