Tuesday, March 5, 2024

‘भारत जोडो यात्रे’मध्ये रितेश देशमुख झाला भवूक, पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना

अनेक दिवसांपासून ‘भारत जोडो यात्रा‘च्या चर्चा सर्वत्र पसरल्या आहेत. नुकतंच ही यात्रा महाराष्ट्रीमध्ये आली आहे. यामध्ये सामान्य माणसापासून ते अनेक राजकारणी या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. अशातच कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने सोशल मीडियावर भारत जोडो यात्रेची एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता रितेश देशमुख मराठी सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखिल तो प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने हे बेबी, हाऊसफुल4, लय भारी, सराख्या अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याने प्रोडक्शन क्षेत्रामध्येही पदार्पण केले आहे. तो सोशल मीडिायवर खूप सक्रिय असतो, तो सतत आपल्या वडिलाविषयी काहीतरी लिहित असतो. ‘भारत जोडो यात्रे’मध्ये आपल्या वडिलांचा फोटो पाहूण अभिनेत्याने भावूक होऊन आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

रिततेशने ट्वीटरवर ट्वीट करत भारत जोडो यात्रेचा एक फोटो शेयर केला, ज्यामध्ये एक व्यक्ती महाराष्ट्रीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाला आहे. हे पाहून रितेशला अभिमान वाटत असून त्याने भावूक होत हा फोटो ट्वीटरला शेअर केला आहे. यावर प्रेक्षकांनी त्यालाच उलट प्रश्न विचारले आहेत. एका युजरने कमेंट करत रितेशलाच प्रश्न करत लिहिले की, “तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये कधी सहभागी होणार?…तुम्ही तर या यात्रेमध्ये दिसत तर…नाही.” अनेकांनी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये’ “स्वत: सहभागी व्हा” असं सुचवलं आहे. तर काहींनी,”विलास राव नेहमीच आठवणीत राहतील,” असं देखिल म्हटलं आहे.

अभिनेत्याने हे ट्वीट केल्यानंतर सोशल मीडियावर सध्या रितेशच्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणी त्याला ट्रोल करत आहेत तर कोणी त्याचे कौतुक केले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुख:द! स्टँडअप कॉमेडियन गॅलाघर यांचे निधन, वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
माहिरा शर्माने बोल्डनेसची हद्दच केली पार, पाहा बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा