Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस १३’ नंतर ‘या’ कारणामुळे शहनाझने कमी केले तब्बल १२ किलो वजन; नवीन लूकबद्दल स्वतः केला खुलासा

कलाकार म्हटले की त्यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवता आली पाहिजे. कलाकार लवकर आणि जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी रियॅलिटी शोचा आधार घेतात. अशा शोमुळे कलाकरांना कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळते. कलाकरांना मोठी प्रसिद्धी मिळवून देण्यात सर्वात मोठा हात असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला सर्वात विवादित शो म्हणून ‘बिग बॉस’ शो ओळखला जातो. या शोमध्ये सहभागी स्पर्धकांना मोठी प्रसिद्धी मिळते आणि याचा त्यांच्या करियरसाठी त्यांना खूप फायदा होतो.

बिग बॉस १3 मध्ये सहभागी झालेली स्पर्धक म्हणजे ‘शहनाझ गिल’. या शोमध्ये शहनाझला तिच्या हटके अंदाजामुळे तुफान प्रसिद्धी मिळाली. शो संपल्यानंतरही शहनाझच्या लोकप्रियतेत कमी तर नाही झाली, उलट तिची लोकप्रियता अधिक वाढली.

बिग बॉस १३ नंतर ते आतापर्यंत शहनाझमध्ये मोठा बदल झाला आहे. शहनाझने जवळपास तिचे १२ किलो वजन कमी केले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी शहनाज सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

नुकतेच शहनाझने यूट्यूबवर पहिल्यांदाच लाईव्ह सेशन घेतले. या सेशन दरम्यान तिला तिच्या या ट्रांसफॉर्मेशनवर प्रश्न विचारण्यात आला. एका फॅनने तिला विचारले की “तू बिग बॉसच्या दिवसात जास्त चांगली दिसायची.” या प्रश्नाला उत्तर देताना शहनाझ म्हणाली, “त्यासाठी जास्त खावे लागेल. काम मिळवण्यासाठी इथे बारिकच असावे लागते. नाहीतर काम मिळणार नाही.” शहनाझने लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण वेळ स्वतःसाठी देत १२ किलो वजन कमी केले. तिच्या या बदललेल्या लूकवर फॅन्स नेहमीच तिला प्रश्न विचारत असतात.

शहनाझच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच ‘रख हौंसला’ या पंजाबी सिनेमात दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. तसेच शहनाझ सिद्धार्थ शुक्लासोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा