Monday, October 27, 2025
Home कॅलेंडर ‘ती’ एक गोष्ट ऐकताच राखी सावंतने घेतला होता ‘पॉर्नस्टार’ होण्याचा निर्णय

‘ती’ एक गोष्ट ऐकताच राखी सावंतने घेतला होता ‘पॉर्नस्टार’ होण्याचा निर्णय

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत सध्या जोरदार चर्चेत आहे. राखी सध्या बिग बॉस या शोच्या १४ पर्वात चॅलेंजर म्हणून सहभागी झाली आहे. राखीला भलेही चित्रपट आणि मालिकांमध्ये यश मिळाले नसले तरी तिने तिच्या विचित्र वक्तव्यांमुळे आणि वादांमुळे बरीच प्रसिद्धी कमावली आहे. राखी सध्या बिग बॉसमध्ये तिच्या वागण्याने आणि बोलण्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. राखी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यांनतर तिला बिग बॉसच्या १४ व्या पर्वात पुन्हा चॅलेंजर म्हणून सहभागी केले गेले. याचा फायदा नक्कीच कार्यक्रमाच्या निर्मात्यांना झाला आहे. राखी रोज नवनवीन गोष्टी करत, आगळेवेगळे विधाने करत कार्यक्रमात मजा आणत आहे. त्यामुळे बिग बॉस प्रेक्षकांमध्ये देखील गाजताना दिसत आहे.

प्राप्त माहितीनुसार राखीने एका मुलाखतीदरम्यान खळबळजनक वक्तव केले होते. राखीने त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, माझ्या आयुष्यात एक असा काळ आला होता जेव्हा मी एक पॉर्न स्टार होण्याचे ठरवले होते. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा सनी लियोनीच्या पहिल्या ‘रागिनी एमएमएस-२’ चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले तेव्हा राखीने हे विधान केले होते. सनी ही बॉलीवूडमध्ये येण्याआधी एक पॉर्न स्टार होती. ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष सक्रिय होती. त्यामुळे तिला अडल्ट स्टार म्हणून ओळखले जायचे.

मात्र तिने बिग बॉसमध्ये सहभाग घेतल्यानंतर ती बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून कमी करू लागली. तिने एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस-२’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत एंट्री केली.

तिच्या समर्थानात एकदा आमिर खानने सांगितले होते की, जर मला एखादा चांगला प्रोजेक्ट आणि चांगली कथा मिळाली ज्यात सनी फिट बसू शकते, तर मी नक्कीच तिच्यासोबत काम करेल. जेव्हा राखीला याबद्दल समजले तेव्हा तिने देखील, ‘मला सुद्धा पॉर्न स्टार व्हायचे’ असे सांगितले होते.

राखीला इंडस्ट्रीने पॉर्न स्टारला स्वीकारून तिला चित्रपटात काम मिळत असल्याने राखीला तिच्याबद्दल आकस निर्माण झाला होता म्हणून तिने सोशल मीडियावर पॉर्नस्टार होण्याचे जाहीर केले होते.

सध्या बिग बॉसमध्ये राखी अभिनव शुक्लाच्या मागे लागली असून, ती अभिनवसाठी वेगवेगळ्या हरकती करताना दिसत आहे. प्रेक्षकांनाही तिचा ड्रामा पाहायला खूप मजा येत आहे.

हे देखील वाचा