Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड ‘मला अटक झालीच नाही’, आपल्या नावाबाबत उडालेला गोंधळ पाहून ‘बिग बॉस १४’ फेम एजाज खानची पोस्ट

‘मला अटक झालीच नाही’, आपल्या नावाबाबत उडालेला गोंधळ पाहून ‘बिग बॉस १४’ फेम एजाज खानची पोस्ट

चित्रपटसृष्टीत अनेकवेळा एकसारखे नाव असल्यामुळे खूप गोंधळ उडतो. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. अभिनेता एजाज खानला एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अभिनेत्याने ‘लकीर का फकीर’ आणि ‘या रब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु यामुळे ‘बिग बॉस १४ चा’ स्पर्धक एजाज खानला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खरं तर दोघांचीही नावे एकसारखी असल्यामुळे अनेकांना वाटले की, ‘बिग बॉस १४’ फेम एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. याच गोंधळामध्ये ‘बिग बॉस १४’ फेम एजाज खानने चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

‘बिग बॉस १४’ फेम एजाज खानने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपला फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना स्पष्ट केले आहे की, एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात त्याला अटक केलेली नाही. एजाजने  चश्मा घातलेला फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले की, “E I J A Z K H A N… जर तुम्ही आताही गोंधळला असाल, तर मी स्पष्ट करतो की, मी आपला नवीन चष्मा घेतला आहे. जर तुम्हाला वाटते की, मला अटक केली आहे, तर तुम्हीही आपला चष्मा घातला पाहिजे.” यासोबतच त्याने हॅशटॅग वापरत ‘मला काही फरक पडत नाही,’ असेही लिहिले आहे.

‘बिग बॉस १४’ दरम्यान एजाज खान आपल्या धाकड अंदाजासाठी प्रसिद्ध झाला होता. शोदरम्यान त्याने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

-भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडलं गेलं अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नाव, म्हणाली, ‘मी कोणत्याही क्रिकेटपटूला…’

-नुसता राडा! राजामौली यांच्या ‘या’ चित्रपटाने रिलीझपूर्वी केली ९०० कोटी रुपयांची कमाई, ‘बाहुबली’लाही टाकले मागे

हे देखील वाचा