Saturday, July 6, 2024

लपाछपीचा खेळ संपला.! पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला राखी सावंतचा पती, लग्नाबाबत मोठा खुलासा

बिग बॉसच्या घरात राखी सावंत एक चॅलेंजर म्हणून परतली. बऱ्याच वर्षांनंतर राखीने बिगबॉसमध्ये एन्ट्री केली. तरीही बिग बॉसच्या घरात राखीचे मित्र कमी अन् शत्रूच जास्त झाले आहेत.

राखी जेव्हापासून घरात आली साहे, तेव्हापासून घरात दररोज नवा ड्रामा होत आहे. अशातच राखीचे घरात सर्वात जास्त कुणाशी वाद होत असतील तर ती व्यत्ती म्हणजे निक्की तांबोळी.

गेल्याच आठवड्यात निक्की आणि राखी यांच्यात कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं. यात दोघींनी एकमेकींना खूप अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. यावर कालच्या विकेंडला सलमान खान याने राखीला खडे बोल सुनावले.

Big Boss 14 Pic
Big Boss 14 Pic

राखीने देखील तिची चूक मान्य करत निक्की आणि ईश्वर यांची माफी देखील मागितली होती. या सर्व घटनांत राखी सावंत हीचा पती हा आश्चर्यकारकरित्या माध्यमांसमोर आला आहे. यासोबतच त्याने निक्की आणि मनू यांना फैलावर घेतलं.  राखी सावंतचा पती रितेश हा निक्की आणि राखी या दोघींच्या वादावर नाखूष आहे. त्यामुळेच अखेर तो माध्यमांसमोर आला. 

तो दर्शक म्हणून म्हणाला की, या  वादात राखी आणि निक्की दोघींची चूक आहे. परंतू, सरुवात मात्र निक्कीने केली होती. यानंतर दोघीही चुका करतच गेल्या.

रितेशने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, हा खेळ बुद्धिचा खेळ आहे, त्यामुळे निक्कीने टास्कप्रमाणे खेळ खेळावा. त्याचवेळी, आपल्या पत्नीला पाठिंबा देण्यासाठी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर रितेश म्हणाला, “जर मला या शोच्या वतीने बोलावण्यात आले तर मी नक्कीच शोमध्ये जाऊन राखीला पाठिंबा देईन. मला असं वाटतं की, राखीला आता माझ्या समर्थनाची खूप आवश्यकता आहे.

Big Boss 14
Big Boss 14

राखीने घरात प्रवेश करण्यापूर्वी एकत्र जाण्याबद्दल मला विचारलं होतं असं रितेश म्हणतो. लग्नानंतर हे दाम्पत्य एकमेकांपासून याआधी कधीही वेगळं राहिलेलं नाही.

फोनच्या माध्यमातून सतत एकमेकांशी जोडलो होतो. परंतू यावेळी आम्ही पहिल्यांदा एकमेकांपासून इतके दूर राहत आहोत. मागच्याच आठवड्यात राखीने मनू पंजाबी आणि अभिनव यांच्यासमोर लग्नाबद्दलचा खुलासा केला होता. बाळ झाल्यानंतर रितेश सर्वांसमोर येणार होता. परंतू बिग बॉसच्या घरात राखीसोबत घडलेल्या या सर्व प्रकरणानंतर रितेश अखेर आपल्याला माध्यमांसमोर आल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील वाचा