राखी सावंत म्हणजेच इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन. राखी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या विधानांमुळे ती लाईमलाइट येतच असते. आता राखी पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे बिग बॉस हा शो. राखीने काहीच दिवसांपूर्वी बिग बॉस सिझन १४ च्या घरात एन्ट्री घेतली आहे. राखीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री काय घेतली फुल्ल ऑन ड्रामा यायला सुरुवात झाली आहे. राखीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.
राखीचा त्या व्हिडिओमध्ये असलेला अवतार पाहून बघणारा घाबरत आहे.
राखीने चॅलेंजर म्हणून बिग बॉसच्या १४ व्या पर्वात एन्ट्री घेतली. राखीसोबतच अर्शी खान, विकास गुप्ता, मनु पंजाबी, आणि राहुल महाजन यांनीही या पर्वात प्रवेश केला आहे. राखीचा एक व्हिडिओ कलर्स चॅनेलने जरी केला आहे. त्यात राखी काही विचित्र हरकती करताना दिसत आहे. ती या व्हिडिओ मध्ये सांगत आहे की तिच्यावर भुताची सावली आहे.
त्यामुळेच ती विचित्र वागत आहे, त्यात तिने स्वतःचे नाव जुली आणि ती २०० वर्षांपासून अतृप्त असल्याचे सांगितले. या व्हिडिओमध्ये ती आरशात बघून स्वतःशीच बोलते तर कधी घरातल्या लोकांशी बोलताना दिसत आहे. ती ”रौंदे है मुझको तेरा प्यार’ हे गाणे देखील गातांना दिसत आहे.
https://www.instagram.com/tv/CJJtv0dlGMI/?utm_source=ig_web_copy_link
राखीचा हा अवतार बघून घरातले लोक संभ्रमात पडले असून. त्यांना तिचा अवतार बघून भितीतर नक्कीच वाटत आहे. राखी तिचे मोकळे सोडलेले केस सुजलेला चेहरा भीतीदायकच दिसत आहे. घरातले सर्व लोक राखीच्याच या विचित्र वागण्यावर चर्चा करताना दिसत आहे. त्यातच जास्मिन राखीला विचारते, तू खुश आहेस का? त्यावर राखी तिला उत्तर देते मी मागील २०० वर्षांपासून अतृप्त आहे.










