‘बिग बॉस’ फेम रुबीना दिलैकने केले दु:ख व्यक्त, मजबुरीमुळे विकावी लागली घरे आणि कार


छोट्या पडद्यावरून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि बिग बॉस १४ ची विजेती रुबीना दिलैकने मध्यंतरी तिच्या एका मुलाखतीत काही खुलासे केले आहेत. तिच्यासोबत एका निर्मात्याने फसवणुक केली होती. ही छोटी नव्हती, तर तिला १६ लाखाचे नुकसान झाले होते. यामुळे अभिनेत्रीला तिचे घर आणि गाडी देखील विकावी लागली होती. रुबीनाने सांगितले की, प्रॉडक्शन हाऊसने जे रेकॉर्ड दाखवले, ते सर्व खोटे होते. रुबीना दिलैकने तिच्या करिअरची सुरुवात छोटी बहू या मालिकेद्वारे केली होती. यात ती राधिकाच्या भूमिकेत दिसली होती.

करिअरची सुरूवात
या मालिकेमुळे रुबीना खूप प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर कलर्स चॅनलवर तिने ‘शक्ती’ या मालिकेत रुबीनाने एका तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. नंतर तिने सलमान खानचा शो ‘बिग बॉस १४’ची ट्रॉफी देखील जिंकली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रुबीना खूप प्रसिद्ध झाली आणि तिचा चाहतावर्ग देखील वाढला. (bigg boss 14 winner rubina dilaik open up she cheated of 16 lakhs by a producer)

रुबीना दिलैकने फसवणुकीबद्दल बोलताना सांगितले की, २०११मध्ये तिचे पेमेंट बाकी होते. जेव्हा ९ महिने झाले तेव्हा तिने निर्मात्याला एकदा भेटायला बोलावले आणि विचारले हे सर्व काय आहे. तिने सांगितले की, प्रोडक्शन हाऊसने शूटिंगच्या दरम्यान झालेले नुकसान तिला दाखवले. ज्याच्यामध्ये १६ लाख रुपये थकबाकी दाखवली होती.

विकावे लागले तिचे घर
रुबीना पुढे सांगताना असे म्हणते की, “२०११ मध्ये माझ्या अपलिंकची किंमत १६ लाख होती. परंतु हे रेकॉर्ड अजिबात खरे नव्हते. ९ घटना रेकॉर्डमध्ये लिहिल्या गेल्या होता, ज्या बरोबर नव्हत्या.” एका घटनेबद्दल बोलताना रुबीनाने सांगितले की, शूटिंग करताना तिला एक किडा चावला होता. ज्यामुळे तिला दोन-तीन तास ताप होता. शूटिंगच्या दरम्यान पूर्ण दिवसाच्या वेळापत्रकामध्ये, त्या दिवशीच्या घटनेमुळे तासाच्या हिशोबाने तिचा पेमेंट कापला गेला. जो १.४० लाख रुपये होते. हे सर्व तिला तिच्या खिशातून भरावे लागले.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!