लाफ्टरक्वीन भारती सिंगची संपत्ती ऐकून डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, शोच्या एका भागासाठी घेते ‘इतके’ मानधन


भारती सिंग (Bharti Singh) ही लोकप्रिय कॉमेडियन आहे. अमृतसरमध्ये जन्मलेल्या भारतीने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले. भारतीने तिच्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर आयुष्यात यश मिळवले आहे. प्रेक्षकांना हसवून भारती आज करोडपती झाली आहे. एवढेच नाही, तर भारती ‘द कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडमध्ये काही मिनिटांसाठी लाखो रुपये फी घेते.

भारती ही लोकप्रिय कॉमेडियन आहे. भारतीला स्वतःच्या बळावर यश मिळाले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, भारतीची एकूण संपत्ती २२ कोटी आहे. भारती एक एपिसोड होस्ट करण्यासाठी ६ ते ७ लाख रुपये घेते. भारतीचे मासिक उत्पन्न २५ लाख रुपये असून, ती वार्षिक ३ कोटींहून अधिक कमाई करते.

भारतीला आलिशान लाईफ जगणे आवडते. भारतीकडे अनेक गाड्या आहेत. यासोबतच तिच्याकडे ऑडी, मर्सिडीज आणि बेंझ जीएल या लक्झरी गाड्या देखील आहेत. कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये काही मिनिटांच्या अभिनयासाठी भारती सिंग किमान ५ ते ६ लाख रुपये घेते. भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. भारती आणि हर्ष दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले. भारती सिंग आता आई होणार आहे. भारतीने नुकतीच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

 

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना भारतीने लिहिले होते की, “हे आमचे सर्वात मोठे सरप्राईज होते, का थांबला… आता करा सबस्क्राईब.” भारतीने हा व्हिडिओ शेअर करताच ही बातमी सोशल मीडियावर आग लागल्यासारखी पसरली आणि आता तिचे चाहते, सेलिब्रिटींसह तिचे अभिनंदन करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीचा हा प्रारंभिक टप्पा आहे, त्यामुळे तिने सर्व कामातून ब्रेक घेतला आहे. इतकेच नाही, तर कॉमेडियनने निरोगी गर्भधारणेसाठी वजन कमी केले होते. यासह, जर आपण वर्कफ्रंटबद्दल बोललो, तर भारती आणि हर्ष हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अँकर आहेत. सध्या भारती कपिल शर्माच्या शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करत आहे.

हेही वाचा-

‘सुपरस्टार’ शब्द देखील छोटा वाटावा असे स्टारडम मिळवणारे रजनीकांत अभिनयात आले तरी कसे?

लग्नाच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने लिहिली खास पोस्ट; विराटही म्हणाला, ‘तू माझं आयुष्य आहेस.’

सनी लिओनीने मवाली स्टाईलमध्ये केला डान्स, चक्क लुंगी नेसून उडवली चाहत्यांची झोप


Latest Post

error: Content is protected !!