छोट्या पडद्यावर अनेक रियॅलिटी शो आहेत. प्रत्येक शोचा आपला वेगळा चाहतावर्ग आहे. यापैकीच एक शो म्हणजे सर्वात वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा ‘बिग बॉस’ (Bigg Boss) होय. हा शो जरी वादग्रस्त असला, तरीही त्याची लोकप्रियता गगनाला भिडलेली आहे. कदाचित म्हणूनच सध्या या शोचे १५ वे पर्व सुरू आहे. या शोमध्ये आतापर्यंत मोठ्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध कलाकार आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावत असतात. आता या कलाकारांमध्ये अभिनेत्री सारा अली खानचाही (Sara Ali Khan) समावेश झाला आहे.
सारा या शोमध्ये आपल्या आगामी ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचली होती. दरम्यान तिने शोचा होस्ट सलमान खानशी (Salman Khan) चांगलीच मजा- मस्ती केली. इतकेच नाही, तर सारा बिग बॉसच्या घरातही गेली, जिथे तिने स्पर्धकांना एक मजेशीर खेळही सांगितला. या खेळात स्पर्धकांना सांगायचे होते की, तिच्यामते घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक कोण आहे. (Bigg Boss 15 Actress Sara Ali Khan Calls Karan Kundra Weakest Player In BB House Trolls Actor)
राखी आणि तेजस्वीमध्ये झाली स्पर्धा
साराने सुरुवातीला राखी सावंत आणि तेजस्वीमध्ये लावणी डान्स स्पर्धा भरवली. या स्पर्धेत कुठेतरी राखी सावंत तेजस्वीवर भारी पडताना दिसली. यानंतर साराने स्पर्धकांना काही प्रश्न विचारले, ज्यांच्या उत्तरात तिने आपल्या विरोधी स्पर्धकापैकी कुणा एकाचे नाव घ्यायचे होते.
करण कुंद्राला मिळाला ‘हा’ टास्क
सारा अली खानने करण कुंद्राला असाच एक टास्क दिला आणि त्याला विचारले की, सर्वात कमकुवत खेळाडू कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरात करणने लीव्हर ओढून दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर केक मारला. यावर सारा थोडी नाराज झालेली दिसली आणि ती म्हणाली, “तुम्ही स्वत: किती सुरक्षित खेळता! तुम्ही सर्वात कमकुवत खेळाडू आहात.”
करण कुंद्राला सुनावले खडेबोल
साराने करणला म्हटले की, साराने करणला सांगितले की, “या केकमध्ये तू तुझा चेहरा मार.”
टीव्ही अभिनेता करण कुंद्राच्या कामगिरीवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला कमी धोका पत्करून सुरक्षित क्षेत्रात खेळण्यास सांगितले आहे. या टास्कनंतर करणच्या खेळाची रणनीती बदलणार का, हे पाहावे लागेल.
दुसरीकडे अभिनेत्री सारा अली खानबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची सन २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…