Wednesday, April 17, 2024

बापरे! जॅकलिनला भेट म्हणून मिळाला होता ५२ लाख रुपयांचा घोडा, तर चार मांजरी ‘इतक्या’ लाखांच्या

बॉलिवूड कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे माध्यमांमध्ये झळकताना दिसतात. कधी ते त्यांच्या आलिशान राहणीमानामुळे, कधी चित्रपटांमुळे, तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचे धनी ठरत असतात. काही कारणं तर चाहत्यांना हैराण करणारीही असतात. असेच काहीसे आहे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबाबत.

दिल्लीच्या तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपयांच्या वसूलीप्रकरणात दररोज नवनवीन हैराण करणारे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण वक्तव्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) आणि जॅकलिन यांनी जानेवारी २०२१ पासून एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. (Actress Jacqeuline Fernandez Received Expensive Gifts Worth 10 Crores From Mastermind ED Sources)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला १० कोटींहून अधिक किमतीच्या महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. महागड्या भेटवस्तूंमध्ये दागिने, हिरे जडवलेल्या दागिन्यांचा सेट, क्रॉकरी, चार पर्शियन मांजरी (सुमारे ९ लाख रुपये किमतीची एक मांजर) आणि ५२ लाख रुपयांचा घोडा यांचा समावेश होता. सुकेशने जॅकलिनच्या भावंडांनाही मोठी रक्कम पाठवली होती. ईडीने जॅकलिनचे जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.

नोरा फतेहीला सुकेशने बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट म्हणून दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटींहून अधिक होती. तिहार तुरुंगातून २०० कोटी वसूल केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा झाला आहे.

सुकेश चंद्रशेखर तुरुंगात असताना तो जॅकलिनशी मोबाईलवर बोलत असे. सुकेश जामिनावर बाहेर आल्यावर त्याने चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती. त्याने जॅकलिनसाठी मुंबई ते दिल्लीचे चार्टर्ड फ्लाईटही बुक केली होती. सुकेश आणि जॅकलिन दोघेही चेन्नईतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जामिनावर बाहेर असताना सुकेशने खासगी विमानातून विमान प्रवासासाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

-रणबीर कपूरचा आकर्षक फोटो शेअर करत, अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनाबाबत दिले संकेत

हे देखील वाचा