Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Bigg Boss 15: उमर रियाझवर गुन्हा दाखल, लावले जातायेत गंभीर आरोप

सध्या उमर रियाझ (Umar Riaz) ‘बिग बॉस १५‘ (Bigg Boss 15) मध्ये धमाल करत आहे. त्याची निराळी स्टाइल चाहत्यांना खूप आवडत आहे. प्रेक्षकांना उमरची गेम खेळण्याची पद्धत देखील आवडते, ज्यामुळे त्याचे चाहते त्याला नेहमीच सपोर्ट करतात. मात्र याच दरम्यान उमर अडचणीत सापडला आहे. दरम्यान फैजान अन्सारी नावाच्या एका व्यक्तीने उमरवर गुन्हा दाखल केला आहे.

फैजान अन्सारीने उमर रियाझवर या सीझनमध्ये परिधान केलेल्या ब्रँडेड कपड्यांसाठी जाणूनबुजून वेगळ्या ब्रँडला टॅग केल्याचा आरोप केला आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेला उमर रियाझ हा ‘बिग बॉस १५’ च्या स्पर्धकांपैकी एक आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक असताना, तो वापरत असलेल्या ब्रँडेड कपड्यांसाठी तो विविध ब्रँडची जाहिरात करतो. या बिग बॉस सीझनमध्ये उमर रियाझने त्याचे ब्रँडेड कपडे दाखवले आहेत, परंतु जाणूनबुजून ब्रँडला बदनाम करण्यासाठी त्याने वेगवेगळ्या ब्रँडला क्रेडिट दिले जे बेकायदेशीर आहे. (bigg boss 15 case registered against umar riaz made this serious allegation)

मुंबईतील रहिवासी फैजान अन्सारी यांनी उमरवर चुकीचा ब्रँड टॅग करून वॉर्डरोब क्रेडिट दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बिग बॉसच्या घरात बिग बॉस स्पर्धक उमरचे ब्रँडेड कपडे पुरवण्याची जबाबदारी फैजान अन्सारी याच्यावर होती. उमरचे सर्व ब्रँडेड कपडे फैजान अन्सारी पुरवले होता.

उमरवर निशाणा साधत फैजान अन्सारी म्हणाला की, “तो फसवणूक करणारा आणि गुंड आहे.” “उमरचे खरा चेहरा लोकांसमोर नक्कीच आणून तो नेमका कोण आहे हे सांगेन”, असेही तो म्हणाला.

यासोबतच त्याच्यावर आतापर्यंत लोकांचा मानसिक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप आहे. फैजान अन्सारी म्हणाला की, “उमर रियाझला लोकांसोबत केलेल्या सर्व गैरकृत्यांसाठी आणि चुकीच्या ब्रँडला बेकायदेशीरपणे टॅग केल्याबद्दल न्यायालयात उत्तर द्यावे लागेल.” सेलिब्रेटी शर्लिन चोप्राचे वकील श्री. सुहेल शरीफ यांनी फैजान अन्सारी यांची बाजू घेतली आहे आणि ते न्यायालयात त्याचे प्रतिनिधित्व करतील.

बिग बॉसबद्दल बोलायचे झाले, तर आजकाल उमर शोमध्ये व्हीआयपी स्पर्धक म्हणून आलेल्या रश्मी देसाईसोबत (Rashami Desai) खूप बोलताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना शोच्या अगोदर पासून ओळखतात आणि एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

हे देखील वाचा