×

Bigg Boss 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही

‘बिग बॉस १५’च्या (Bigg Boss 15) घरात वाइल्ड कार्ड्सची एन्ट्री झाल्यापासून, घरात वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. राखी सावंतसोबत (Rakhi Sawant) तिचा पती रितेशही (Ritesh) वाईल्ड कार्ड एन्ट्रीच्या रूपात घरात आला आहे. पहिल्या दिवशी रितेश अतिशय शांत होता, तर दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या घरात त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. तो घरात येताच त्याने तेजस्वी (Tejasswi Prakash) आणि करणचे (Karan Kundrra) नाते खोटे असल्याचे म्हटले होते, तर उमर रियाझसोबतही (Umar Riaz) त्याचा जोरदार वाद पाहायला मिळाला.

बिग बॉसच्या घरात सांगितला भूतकाळ
नुकतीच देवोलिना (Devoleena Bhattacharjee) रितेशसोबत तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना दिसली, तर रितेशनेही देवोलिनासमोर त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल काही गोष्टी उघड केल्या. रितेशने सांगितले की, राखी सावंत येण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती. जिच्यावर तो खूप प्रेम करत होता आणि जिने त्याचे आयुष्य चांगले बनवले होते. (bigg boss 15 rakhi sawant husband ritesh revealed about his past girlfriend in front of devoleena bhattacharjee getting emotional)

रितेशने काढली गर्लफ्रेंडची आठवण
रितेशने देवोलिनाला भावूक होताना पाहून तिला सांत्वन केले. पण त्याचवेळी तिला सांगितले की, तो पूर्वी असा अजिबात नव्हता. तो म्हणाला, “मी आज जसा आहे, तसा पूर्वी नव्हतो. खुश असायचो आणि सतत फिरत राहायचो. मी माझे आयुष्य कधीच गांभीर्याने घेतले नव्हते, पण त्यादरम्यान माझ्या आयुष्यात एक मुलगी आली जिने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला.”

‘जे आहे तिच्यामुळेच आहे’
रितेशने देवोलीनाला सांगितले की, ती मुलगी आता या जगात नाही. पण आज तो जे काही आहे, त्याच मुलीमुळे आहे. देवोलिनासोबतच रितेशही त्याचे जुने आयुष्य आठवून खूप भावूक झाला. यादरम्यान राखी सावंत रितेश आणि देवोलिनाचे संभाषण दुरूनच उभी राहून ऐकत होती. मात्र त्यांच्यात काय चालले आहे, याची तिला काहीच कल्पना नव्हती.

राखीला राग आला
देवोलिना काय बोलत होती, असे राखीने विचारल्यावर रितेश खूपच भावूक झाला. हे पाहून राखीला त्याचा राग आला आणि ती म्हणाली की, “तू इतका भावूक का होत आहेस?” ज्याला उत्तर देताना रितेश म्हणाला की, “ती ज्या प्रकारे रडत होती, त्यामुळे मी खूप दुःखी झालो.” रितेशचे बोलणे ऐकून राखी म्हणाली, “तू त्यांच्यावर डोळे बंद करून इतका विश्वास ठेवू नकोस.” मात्र राखीचे असे बोलणे रितेशला अजिबात आवडले नाही. त्यानंतर राखी आणि रितेशमध्येही चांगलाच वाद पेटला.

हेही नक्की वाचा –

Latest Post