Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’, करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’ चांगलाच चर्चेत आहेत. या शोमध्ये दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. अशातच बिग बॉस सदस्य करण कुंद्राने शमिता शेट्टीला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने त्याची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरसोबत असलेल्या त्याच्या नात्याचा खुलासा केला आहे.

यावेळी तो म्हणतो की, “जर आमच्यात संवाद राहिला असता तर आज आम्ही वेगळे झालो नसतो. जर आम्ही एकमेकांशी गोष्टी शेअर केल्या असत्या तर आम्हाला आमचे प्रॉब्लेम्स समजले असते आणि आमचे ब्रेकअप झाले नसते. अनुषा अनेक गोष्टी शेअर करत होती. परंतु मी काही सांगत नव्हतो, त्यामुळे आम्ही वेगळे झालो.” करणने हे देखील सांगितले की, अनुषासोबत रिलेशनमध्ये असताना तो त्याच्या मित्रांपासून देखील दूर गेला होता. त्याच्या मित्रांसोबतचा त्याचा संपर्क देखील कमी झाला होता. (Bigg boss 15 contestant karan Kundra talk about his breakup with Shamita Shetty )

यावर शमिता त्याला म्हणते की, “जर अनुषा हा शो बघत असेल तर तिला नक्कीच समजेल.” यावर करण म्हणतो की, “तिला नाही समजणार, कारण तिला भडकवणारे खूप आहेत.” शमिता म्हणते की, “त्याने काहीही होत नाही. जर तिचे तुझ्यावर प्रेम असेल तर कोणीही कितीही भडकवले तरीही काहीच फरक पडणार नाही. मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांना डेट केले आहे. ते माझ्या घरातील लोकांना अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे मी तुझ्या या गोष्टी समजू शकते.”

नुकतेच शोमध्ये करण शमिता आणि अनुशा यांच्यात तुलना करत म्हणत होता की, “दोघीही इमानदार, इमोशनल आहेत. दोघींनी ही जर एखादी गोष्टी ठरवली तर त्यापासून लांब जात नाही. दोघींमध्ये या गोष्टी सारख्याच आहेत.”

जेव्हा तेजस्वीने करणला विचारले की, “तो शमितावर प्रेम करू शकतो का?” यावर त्याने उत्तर दिले की, “नाही, भलेही दोघींमध्ये समानता असेल तरीही तो कधीही शमितावर प्रेम करू शकणार नाही. तसेच त्याने हे देखील सांगितले की, शमिता आणि राकेश बापट रिलेशनमध्ये आहेत आणि ते खूप प्रेम करतात.” शोमध्ये करण आणि तेजस्वीमध्ये खूप चांगला बाँड आहे. ते दोघे घरात खूप वेळ एकत्र घालवतात. तसेच करणने शोमध्ये हे देखील सांगितले होते की, तेजस्वी त्याची क्रश आहे. तसेच त्याच्या मनात तेजस्वीबद्दल काही भावना आहेत. परंतु तेजस्वीकडून याबाबत कधीच उत्तर आले नाही. ती करणला केवळ तिचा एक चांगला मित्र मानते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा