‘वीकेंड का वॉर’मध्ये ईशान सहगलने केले मायशाला प्रपोज, फराह खान म्हणाली, ‘लव एट फर्स्ट नाईट’

‘बिग बॉस १५’मध्ये ‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये म्युझिक, नाटकं, मस्तीपासून ऍक्शनपर्यंत प्रत्येक गोष्ट पाहायला मिळाली. या भागात एक प्रपोजल देखील दिसले. खरं तर, या भागादरम्यान शमिता शेट्टी आणि विशाल कोटियन ‘द अक्का अण्णा’ हा रेडिओ शो होस्ट करत होते. त्यावेळेस त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलून त्यांचा पाय खेचला.

विशाल आणि शमिता ईशानला मायशा अय्यरबद्दलच्या भावना व्यक्त करण्यास सांगतात. ईशान म्हणतो की, “हा शो आणि हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मी या शोच्या प्रेमात पडेल अशी कधीच अपेक्षा केली नव्हती.” तो पुढे म्हणाला की, “बाकीच्या कुटुंबाला फक्त शो मिळाला आहे, पण माझ्याकडे दोन मौल्यवान गोष्टी आहेत, बिग बॉसचे घर आणि मायशा अय्यर. ईशान गुडघ्यावर बसून मायशाला प्रपोज करतो आणि म्हणतो, ‘मला तुझ्याबरोबर ज्या प्रकारचे कनेक्शन वाटते. ते मला कधीच कोणासोबत वाटले नाही. मायशा तू ‘मिशान’ होशील का?’ त्यानंतर मायशा त्याला मिठी मारते आणि म्हणते, “मी तुझ्यावर प्रेम करते.” यानंतर दोघांनी इश्क वाला लव्ह गाण्यावर डान्स केला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यानंतर फराह खान शोमध्ये विशेष पाहुनी म्हणून आली आणि सलमान खानला भेटली. जिथे सलमान त्यांना ईशानच्या प्रपोजलबद्दल सांगतो. यावर फराह म्हणते की, “कोणी इतक्या लवकर कुणाच्या प्रेमात कसे पडू शकते.” पुढे ती म्हणते की, “मी लव्ह एट फर्स्ट साइटबद्दल ऐकले होते, हे लव एट फर्स्ट नाइट आहे.”

त्याचवेळी, मायशा तिच्या या प्रपोजलबद्दल खूप आनंदी दिसली. निशांत भट्ट तिला म्हणतो की, “तुमच्या मेंदूचा वापर करा आणि शोमध्ये मूर्ख होऊ नका” असे म्हणत तो तिला इशारा देण्याचा प्रयत्न केला. मायशा थोडी चिडलेली दिसली आणि त्याला म्हणते की, ‘मला ईशानचे प्रपोजल गोड आणि खरे वाटले.’ दसऱ्याच्या विशेष प्रसंगी कोणालाही शोमधून वगळण्यात आले नाही.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

Latest Post