Friday, March 27, 2026
Home अन्य स्पर्धकांना करावे लागेल जंगल पार; मगच उघडतील घराचे दार; ‘बिग बॉस १५’चा प्रोमो रिलीझ

स्पर्धकांना करावे लागेल जंगल पार; मगच उघडतील घराचे दार; ‘बिग बॉस १५’चा प्रोमो रिलीझ

टीव्हीचा सर्वात मोठा रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सुरू असलेला बिग बॉस ओटीटी पूर्ण झाल्यानंतर, शोचे निर्माते बिग बॉसची टीव्ही आवृत्ती सुरू करणार आहेत. हा शो सुरू होण्याआधीच, ‘बिग बॉस १५’ बद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे. या शोचे चाहते टीव्हीवर त्यांचा आवडता होस्ट सलमान खानला पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. याच दरम्यान शोच्या निर्मात्यांनी शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. हा प्रोमो व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह त्यांच्या आवडत्या शोसाठी आणखी वाढतो आहे.

या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान जंगलात बिग बॉसचे घर शोधताना दिसत आहे. प्रोमोची सुरुवात विश्वसुंत्री रेखा यांच्या आवाजाने होते, ज्यात त्या म्हणतात की, “सलमान, तू १५ वर्षे वाट पाहिली, आता कुठेतरी हृदयाला बरं वाटतंय.” यानंतर सलमान म्हणतो की, “मी विश्वसुत्री तुमचा खूप आभारी आहे, पण इथे बिग बॉसचे घर होते, जे कुठेही दिसत नाही.” (Bigg Boss 15 is coming soon, the promo of the show has been released)

यानंतर विश्वसुंत्री रेखा म्हणतात की, “मेरी जान, यावेळी कुटुंबातील सदस्यांना आधी जंगल पार करावे लागेल, त्यानंतर बिग बॉसच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडतील.” यानंतर सलमान खान म्हणतो की, “तुम्ही लोक खूप हसणार आहात, कारण बिग बॉसचे सदस्य खूप वाईट रीतीने अडकणार आहेत. जंगलात संकट पसरणार आहे. दंगल पे दंगल.”

स्पर्धकांना प्रवेशापूर्वी अनेक आव्हानांवर करावी लागेल मात!
शोचा प्रोमो व्हिडिओ पाहून हे स्पष्ट झाले आहे की, बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी स्पर्धकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. ‘बिग बॉस १५’ या वेळी संकट आणि नवीन वळणांनी भरलेला असेल, तर दुसरीकडे, शोमध्ये एव्हरग्रीन रेखा यांच्या एन्ट्रीने चाहत्यांचा उत्साह द्विगुणित केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा