Tuesday, July 9, 2024

बिग बॉसमध्ये आलेल्या ज्योतिषाने केली बिग बॉस १५ च्या विजेत्याची घोषणा, सर्वांना पछाडत ‘हा’ स्पर्धक ठरणार विजेता?

बिग बॉस टेलिव्हिजन विश्वातला सर्वात चर्चेत असणारा आणि सर्वात जास्त गाजणार शो. या शोच्या प्रत्येक पर्वाने तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. बिग बॉस या शोचे नाव बऱ्याच कारणांसाठी वाईट देखील आहे. मुख्य म्हणजे शोमध्ये होणाऱ्या टोकाचे वाद, एकमेकांवर होणाऱ्या हीन दर्जाच्या कमेंट्स, भांडणं, वाद या गोष्टी या शोची जणू ओळखच बनल्या आहेत. काहीही असले तरी बिग बॉसची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने बघतात. प्रत्येक पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांना हा शो एक वेगळी ओळख आणि लोकप्रियता देखील देऊन जातो. कायम स्वरूपी त्या कलाकाराच्या उपलब्धीमध्ये बिग बॉसचा विजेता किंवा बिग बॉसचा स्पर्धक ही बाब जोडली जाते. त्यामुळे शोचे नाव कसेही असले तरी अनेक कलाकार या शोमध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. यंदाचे या शोचे १५ पर्व देखील अनेक वाद आणि भांडणांमुळे गाजत असून, स्पर्धक देखील भरपूर लोकप्रिय होत आहे.

बिग बॉसचे चालू अर्थात १५ वे पर्व त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून, या घरात उरलेल्या स्पर्धकांमध्ये नक्की बिग बॉसचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष तर आहे, सोबतच शो कोण जिंकणार या चर्चांना देखील उधाण आले आहे. नुकतेच या शोमध्ये एका ज्योतिषाने हजेरी लावली आणि त्याने यावर्षी शोचा विजेता कोण होणार याबद्दल सांगितले आहे.

ज्योतिषाने नाव घेतलेला स्पर्धक आहे, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता आणि लव्हर बॉय करण कुंद्रा (Karan Kundrra) आहे. हो शोमध्ये हजेरी लावलेल्या ज्योतिषाने बिग बॉसचे १५ वे पर्व अभिनेता करण कुंद्रा जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी ऐकून करण कुंद्रा खूपच खुश झाला आणि ज्योतिष्यांना धन्यवाद म्हणू लागला. गुरुजींची ही भविष्यवाणी ऐकून राखीला मोठा धक्का बसला. ती ही भविष्यवाणी ऐकताना तोंड मोठे करून बसली होती.

राखी सावंत (Rakhi Sawant) देखील हा शो जिंकण्याच्या दृष्टीने खेळताना दिसत आहे. याआधी देखील ती यशोमध्ये आली होती मात्र तील शो काही जिंकता आला नाही. यावर्षी ती शो जिंकण्यासाठी १००% प्रयत्न करताना दिसत आहे. ही भविष्यवाणी ऐकून आता राखी अधिक सतर्क झाली आहे. कारण आता करण कुंद्रा देखील विजयाचा मोठा दावेदार मानला जात आहे. शोमध्ये झालेल्या वाईल्ड कार्ड एंट्री नंतर बिग बॉसमध्ये खरी धमाल आणि मजा पाहायला मिळाली. शोच्या टीआरपीवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला होता.

करण कुंद्राबद्दल सांगायचे झाल्यास तो पुन्हा एकदा योग्य ट्रॅकवर परतला असून, तेजस्वी आणि करण यांच्यात सुरु असणाऱ्या रोमांसमध्ये शमिता मोठा अडथळा ठरत आहे. शोमध्ये शमिता, करण आणि तेजस्वी असा लव्हट्रँगल देखील बऱ्याचदा दिसून येत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा