Thursday, August 7, 2025
Home अन्य बिग बॉसच्या घरात फुलतेय मैत्री! ‘मला तू खूप आवडतेस’, म्हणत ‘या’ मुलीबद्दल व्यक्त झाला करण कुंद्रा

बिग बॉसच्या घरात फुलतेय मैत्री! ‘मला तू खूप आवडतेस’, म्हणत ‘या’ मुलीबद्दल व्यक्त झाला करण कुंद्रा

‘बिग बॉस’च्या १५व्या सीझनची सुरुवात धमाकेदार ठरली. भांडणांसोबत प्रेमाच्या किस्स्यानेही या शोला चार चांद लावलेले पाहायला मिळाले. गेल्या दोन आठवड्यांत कुटुंबातील सदस्यांमध्ये खूप भांडणे होत होती. पण आता तिसरा आठवडा जवळ आल्यामुळे, कुटुंबातील अनेक सदस्यांची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. ईशान आणि मायशानंतर, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची मैत्री घट्ट होताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते या दोघांना खूप पसंत करत आहेत आणि यासोबतच चाहत्यांनी दोघांना ‘तेजरान’चा टॅग दिला आहे. करण कुंद्र आणि तेजस्वी बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासून एकत्र खेळत असले, तरी दोघांना एकमेकांशी बोलण्याची जास्त संधी मिळाली नव्हती.

‘लांब झाल्यासारखं वाटतंय’
तेजस्वी टास्क पूर्ण झाल्यानंतर, करण कुंद्रासोबत बाहेर बसली. यावेळी बोलताना ती म्हणाली की, “मी माझं म्हणणं कमी शब्दात सांगेन.” तेजस्वी म्हणाली, “मला तुझ्यापासून थोडं अंतर जाणवत आहे. तुझ्याशी संवाद साधणे कठीण होत आहे. तुझ्याशी बोलायचं म्हटलं की, तुझ्यापर्यंत पोहोचणंही खूप कठीण होत आहे.” (bigg boss 15 karan kundrra express his feeling towards tejasswi prakash says i am very fond of you)

‘यामुळे’ खराब झालंय तेजस्वीचं डोकं
तेजस्वीने करणच्या पुढे आपली भावना शेअर केली आणि म्हणाली की, “मी कोणाचेही नाव घेणार नाही, पण ही गोष्ट माझं डोकं खराब करते. जरी ही एक समस्या असली, तरी मला पर्वा नाही. जर तसं असेल, तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही.” तेजस्वी पुढे म्हणाली, “खरं सांग, आपण आल्यापासून एकमेकांशी कधी बोललो आहोत का? कधीच नाही.”

‘मी लाजाळू आहे’
तेजस्वीने आपला मुद्दा पुढे नेला आणि म्हणाली की, “मला वाटलं की, आपल्या दोघांची व्हाईब मॅच होते आणि जेव्हा आपण बोलू तेव्हा चांगलं होईल, पण तसं होत नाहीये.” तेजस्वीचं हे बोलणं ऐकल्यानंतर करण म्हणाला की, “मी माझ्या खऱ्या आयुष्यात थोडा लाजाळू आहे, त्यामुळे मला गोष्टींसाठी वेळ लागतो.”

‘मला तू खूप आवडतेस’
करणने आपली भावना व्यक्त केली आणि म्हणाला, “मला तू खूप आवडतेस, ठीक आहे. मला अभिव्यक्त होण्याची अडचण आहे. तू जात असताना मी खूप नाखूष होतो, मी बोललो पण होतो. मला हे बोलतानाही खूप विचार करावा लागला की, मला तुझी खूप आठवण येत होती.” तेजस्वी म्हणाली की, “आपण बसून बोलायची ही पहिलीच वेळ आहे. सर्व कॅमेरे आश्चर्यचकित झाले असतील की काय होत आहे.”

आता येत्या काळात यांची मैत्री अधिक फुलेल की, त्यांच्यात दुरावा निर्माण होईल, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वीकेंड का वॉर’मध्ये ईशान सहगलने केले मायशाला प्रपोज, फराह खान म्हणाली, ‘लव एट फर्स्ट नाईट’

-‘बिग बॉस १५’ सापडला वादाच्या विळख्यात, सेट डिझाईनरवर लावले जातायेत चोरीचे आरोप

-‘बिग बॉस १५’मध्ये अफसाना खानचं ‘जंगली रूप’; अकासा सिंगचा फाडला शर्ट, तर शमिता शेट्टीला म्हणाली ‘म्हातारी’

हे देखील वाचा