टेलिव्हिजन विश्वातील सर्वात विवादित शो कोणता असा प्रश्न विचारला तर सर्वांचे उत्तर एकाच असेल आणि ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हा शो जेवढा त्याच्या मनोरंजनासाठी ओळखला जातो, त्यापेक्षा जास्त तो या शोमध्ये होणाऱ्या वादांमुळे आणि भांडणामुळे ओळखला जातो. सध्या बिग बॉसचा १५ वा सिझन सुरु आहे. हा सिझन देखील त्यात होणाऱ्या विविध वादांमुळे आणि जोरदार भांडणामुळे गाजत आहे. सध्या चालू असलेले बिग बॉसचे १५ वे पर्व त्याच्या फायनल भागाकडे वाटचाल करत आहे. करण कुंद्रा, उमर रियाज, रश्मि देसाई, राखी सावंत हे स्पर्धक ‘टिकट टू फिनाले वीक’मध्ये आधीच पोहचले असून, निशांत, प्रतीक, तेजस्वी (Tejasswi Prakash), शमिता (shamita shetty), अभिजीत बिचकुले, देवोलीना यांच्यात फिनालमध्ये पोहचण्यासाठी लढाई सुरु आहे. सोबतच करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्यात सतत भांडण होताना दिसत आहे.
बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक टास्क दिला होता ज्यात स्पर्धकांना चर्चा करायची होती. या टास्कमध्ये राखी, करण कुंद्रा, रश्मि आणि उमर यांनी जजची भूमिका सांभाळली. उमर आणि रश्मी या टास्कमध्ये सतत सांगत होते की, ते फेयर गेम खेळतील, मात्र दुसरीकडे करण तेजस्वीला जिंकवण्यासाठी इतर जजेसला तिच्याबद्दल मानवताना दिसला. या टास्कमध्ये तेजस्वी आणि अभिजीतला प्रत्येकी एक गुण मिळतो तर शमिताने २ गुण मिळवत आघाडी घेतली आहे.
यातच तेजस्वी करणसोबत भांडण करताना देखील दिसली. यात ती करणला विचारते की, “त्याने शमिताला विजेती का घोषित केले.” तर आता समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये दिसले, तेजस्वी शमितावर आरोप लावते. मात्र इथे त्या दोघींमध्ये भांडण होते. या टास्कमध्ये सर्व जज शमिताला पाठिंबा देतात.
या टास्कमध्ये करणने तेजस्वीला पाठिंबा न देता शमिताला दिला या मोठा बदलामुळे राखी त्यावर मजा घेताना म्हणते, “करण कुंद्राने काय पाठिंबा दिला आहे, आज शमिता…शमिता कुंद्रा झाली.” तेजस्वी शोमध्ये एकटी पडल्याचे चित्र दिसत आहे. पुन्हा तिच्याच ग्रुपने तिला पाठिंबा दिला नाही. तेजस्वी आणि तिच्या ग्रुपमध्ये आलेल्या दरीचा फायदा शमिताला मिळताना दिसत असून, ती हा टास्क जिंकणार असे दिसत आहे.
हेही वाचा :
विकी कौशलने साली इसाबेल कैफला दिल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा
अक्षय खन्नासोबत डेब्यू करणार होती बिपाशा, लग्नाआधी केले ‘या’ ३ अभिनेत्यांना डेट