Tuesday, July 9, 2024

‘बिग बॉस15’मध्ये येण्यापूर्वी ‘या’6 वादात अडकला आहे करण कुंद्रा; एकाला वाजवली होती कानाखाली

करण कुंद्रा हा ‘बिग बॉस 15’च्या स्पर्धकांपैकी एक आहे, जो सतत चर्चेत असतो. गेल्या आठवड्यात करण कुंद्रा सलमान खानच्या निशाण्यावर आला होता. करण कुंद्रा त्याच्या कृत्यांमुळे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही करण कुंद्रा अनेकदा वादात सापडला आहे. आज आपण अशा घटनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे करण खूप चर्चेत आला आहे.

करण कुंद्राने प्रतीक सेहजपालवर उचलला होता हात
प्रतीक सेहजपाल आणि करण कुंद्राने ‘बिग बॉस 15 पूर्वी लव्ह स्कूलमध्ये एकत्र काम केले आहे. या शोमध्ये करण मेंटॉर म्हणून दिसला होता, तर प्रतीक सेहजपाल या शोमध्ये विद्यार्थी होता. लव्ह स्कूलनंतर, प्रतीक सेहजपाल आणि करण ‘बिग बॉस 15′ च्या घरात भेटले. बिग बॉसमधील एका टास्कदरम्यान करणने प्रतीक सेहजपालला जमिनीवर आपटले. मात्र, प्रतीक सेहजपालनेही एकदा बिग बॉसमध्ये करणची तक्रार केली होती. त्यानंतर नॅशनल टीव्हीवर सलमान खानने करणला फटकारले होते.

रोडीजच्या सेटवरही करण कुंद्राने घातला गोंधळ
करणने एमटीव्हीच्या रोडीज रियॅलिटी शोचे परीक्षण केला आहे. या शोच्या शूटिंगदरम्यान करणने एका स्पर्धकाला जोरदार शिवीगाळ केली होती. ऑडिशन दरम्यान एका स्पर्धकाने दावा केला होता की, त्याने बहिणीवर हात उचलला. हे ऐकून करणचे रक्त सळसळले आणि त्याने त्या स्पर्धकावर हात उचलला. नंतर या स्पर्धकाच्या गँगने निर्मात्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर निर्मात्यांनी करणला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता.

करण कुंद्राने त्याच्या सहकलाकारालाही मारली होती कानाखाली
करणने सानवी तलवारसोबत ‘ये कहां आ गये हम’ या मालिकेत काम केले होते. करण आणि सानवी तलवार यांना शोदरम्यान एक सीन शूट करायचा होता. या सीनमध्ये करण कुंद्राला किस करावं लागलं, त्याला प्रत्युत्तर म्हणून सानवी तलवारला कानाखाली मारावी लागली. शूटिंगदरम्यान सानवी तलवारने करण कुंद्राला चापट मारली. सानवी तलवारच्या या कृत्याने करण चांगलाच भडकला होता. असे म्हटले जाते की, यानंतर करणने सर्वप्रथम सानवी तलवारला कानाखाली मारली. यानंतर करणनेही सेटवर आपल्या सहकलाकाराला शिवीगाळ केली होती.

करण कुंद्रावर अनुषा दांडेकरला फसवण्याचा आरोप
अनुषा दांडेकरने 2021च्या सुरुवातीला करणसोबत ब्रेकअप केले. अनुषा दांडेकर आणि करण अनेक वर्षे एकमेकांसोबत होते. ब्रेकअप दरम्यान अनुषा दांडेकरने करणवर फसवणुकीचा आरोप केला होता. मात्र, करणने अनुषाचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते. अनुषा आणि करणच्या ब्रेकअपची बातमी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती.

करण कुंद्रा त्याच्या लिंकअपमुळेही होता चर्चेत
करणने त्याची सहकलाकार कृतिका कामराला काही वर्षांपूर्वी डेट केले आहे. या दोन्ही कलाकारांनी ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेत एकत्र काम केले होते. लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले. या दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने खळबळ उडाली होती. नंतर करणने टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकला डेट करायला सुरुवात केली.

राज कुंद्रामुळे करण कुंद्रा सापडला होता अडचणीत
राज कुंद्राच्या अटकेमुळे करण कुंद्रा मोठ्या अडचणीत सापडला होता. आडनाव एकच असल्यामुळे लोकांनी राज कुंद्रा आणि करण कुंद्रा यांना ट्रोल करायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर करणचा पॉर्नोग्राफी रॅकेटशी संबंध असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यानंतर करणने एक पोस्ट शेअर करून नाराजी व्यक्त केली. चुकीचे नाव वापरणाऱ्यांवर करण संतापला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
Wedding | पार पडली तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राची ‘रोका सेरेमनी’? ‘या’ गोष्टीने दिले संकेत
करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर लग्नाशिवाय झाली आई, बाळाचे फोटो शेअर करत दिली माहिती

 

हे देखील वाचा