Saturday, April 20, 2024

करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर लग्नाशिवाय झाली आई, बाळाचे फोटो शेअर करत दिली माहिती

टीव्ही अभिनेता करण कुंद्राची (Karan Kundra) एक्स गर्लफ्रेंड, मॉडेल आणि अँकर अनुषा दांडेकरची (anusha dandekar) सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या अनुषाचे बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. अनुषा दांडेकरने बाळासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. इंडस्ट्रीतील त्याचे मित्र आणि चाहते अभिनंदन करत आहेत. लग्न झाले नसतानाही अनुषाने बाळाचे फोटो शेअर केल्याने तिचे चाहतेही चकित झाले आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

टिव्ही अँकर अनुषा दांडेकरने छोट्या बाळासोबत टाकलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर मुलीची झलक दाखवताना अनुषाने “शेवटी माझ्याकडे एक छोटी पाहुणी आलीआहे जिलामी माझी म्हणू शकते. मला तिची तुमच्या सर्वांशी ओळख करून द्यायची आहे. ती माझ्यासाठी देवदूत आहे. माझी मुलगी सहारा.. मी तिचे लाड करीन आणि नेहमीच तिचे रक्षण करीन. नेहमी, नेहमीच. मी तुझ्यावर प्रेम करते बाळा, तुझी गॉड मम्मी.” असा गोड कॅप्शन दिला आहे.

फोटोमध्ये अनुषा दांडेकर लहान परीसोबत खेळताना, तिला अंगाई गाताना आणि तिच्याशी बोलताना दिसत आहे. या फोटोंमध्ये अनुषा दांडेकरने लहान मुलीच्या पायाचा फोटोही शेअर केला आहे, जो खरोखरच सुंदर दिसत आहे. अनुषा दांडेकरची मोठी बहीण शिबानी दांडेकरने या फोटोवर अभिनंदन करताना , “लोकांची मुले चोरणे आणि त्यांच्यासोबत फोटो काढणे बंद होईल. हे खूप सुंदर आहे. या छोट्या पाहुण्याला खूप प्रेम.” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
यासोबतच इंडस्ट्रीतील मित्रही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि तिचे अभिनंदन करत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अनुषा दांडेकर लग्नाशिवाय आई होणार असल्याची चर्चा आहे, परंतु तिने या छोट्या पाहुण्याला दत्तक घेतले आहे. अशी माहिती समोर आली आहे. अनुषा दांडेकर अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स देताना दिसते. ती अनेक लोकप्रिय टीव्ही शो होस्ट करताना दिसली आहे. त्यात ‘लव्ह स्कूल’, ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर’ या नावांचा समावेश आहे. याशिवाय अनुषा दांडेकरही अनेक चित्रपटांचा भाग बनली आहे. यात ‘विरुद्ध’, ‘कोण आहे अँथनी?’, ‘डेली बेली’ आणि ‘भावेश जोशी’ असे चित्रपट आहेत

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहिलं को-स्टारवर प्रेम, नंतर प्रसिद्ध मॉडेलवर फिदा झाला करण कुंद्रा; वाचा त्याच्या आयुष्यातील रोचक किस्से
जरा इकडे पाहा! उर्वशीच्या मागणीत सिंदूर अन् गळ्यात मंगळसूत्र; युजर म्हणाले,’मानसिक आरोग्य…’

हे देखील वाचा