Monday, February 24, 2025
Home मराठी खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

सर्वाधिक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. सध्या हा शो ‘बिग बॉस ओटीटी’ या नावाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामधील स्पर्धक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवतात, तर कधी भांडणे करून डोकी दुखी वाढवतात. ‘बिग बॉस’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. यामध्ये स्पर्धकांना रोज वेगवेगळे टास्क खेळून ‘बिग बॉस’च्या घरात टिकून रहावे लागते. अशात आता लवकरच ‘बिग बॉस १५’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये स्पर्धकांना सहभाग घेण्यासाठी जास्त अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

‘बिग बॉस १५’ आता लवकरच टीव्हीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या पर्वामध्ये प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तोच ‘भाईजान’ अर्थातच सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. सलमानने याची माहिती त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. सलमानने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘बिग बॉस १५’चा प्रोमो पोस्ट केला. या व्हिडिओला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या शोमध्ये सलमानची वाट पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. (Bigg Boss 15 promo released Salman Khan reveals new twist for all contestants)

‘या’ कठीण मार्गाने खोलणार ‘बिग बॉस १५’चे दार
सलमानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका जंगलातील झाडाजवळ बसलेला आहे. ते फुलांनी बहरलेलं झाड सलमानला एका महिलेच्या आवाजात बोलते की, “सलमान १५ वर्षांपासून तुझी वाट पाहिली, आता कुठे मनाला शांती मिळाली.” त्यावर सलमान तिला ‘विश्वसुंदरी’ बोलून आभार व्यक्त करतो आणि पुढे बोलतो की, “इथेच कुठे तरी होते बिग बॉसचे घर, पण नेमके कुठे ते दिसतच नव्हतं.” त्यावरती महिलेच्या आवाजात ते झाड पुन्हा एकदा बोलते की, “अरे माझी जान आता बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी आधी हे जंगल पार करावे लागेल, तेव्हा कुठे बिग बॉसच्या घराची दारे उघडी होतील.” सलमान खान ‘बिग बॉस १५’च्या घरात नेमके काय होणार हे सांगताना बोलतो की, “प्रेक्षकांनो तुम्ही आता खूप हसणार आहात, कारण स्पर्धक वाईट पद्धतीने फसणार आहात, संकट-ए-जंगल फैलाएगा दंगल पे दंगल.”

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सुरुवातीचे ६ आठवडे वूटवर २४ तास दाखवले जातील आणि त्यानंतर सलमान बरोबर बाकीचे दिवस टीव्हीवर प्रदर्शित होतील असे सांगण्यात आले होते. परंतु तसे काही झाले नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये लाडक्या बजरंगी भाईजानला पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहीत झाले आहेत. आता ‘बिग बॉस १५’मध्ये आणखी भीतीदायक टास्क घेण्यासाठी तो येणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

हे देखील वाचा