Friday, July 5, 2024

Bigg Boss 15: शोमध्ये आली रितेशची गर्लफ्रेंड, पतीच्या अफेअरबद्दल ऐकून राखी सावंतला धक्का

कलर्स टीव्हीवरील रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’मध्ये सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. राखी सावंत आणि तिचा पती रितेश वाईल्ड कार्ड स्पर्धक बनून आल्यापासून तर शोमध्ये अधिकच रंजकता आलेली पाहायला मिळत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या भागात राखी सावंतला धक्का बसला, जेव्हा तिला कळले की तिचा पती रितेशच्या आयुष्यात आणखी कोणीतरी आहे. सलमान खानने ‘वीकेंड का वार’ दरम्यान घरातील सदस्यांसमोर राखी आणि रितेशला सांगितले की, शोमध्ये रितेशची गर्लफ्रेंड आली आहे. रितेशच्या गर्लफ्रेंडचे नाव स्वीटी असून तो तिच्यासोबत गेल्या ८ वर्षांपासून राहत असल्याचेही सलमानने सांगितले. ते दोघे बेल्जियममध्ये एकत्र राहत होते. हे ऐकून राखीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले.

राखी रितेशला प्रश्न विचारू लागली, तेव्हा त्यांना घरात स्वीटीचा आवाज ऐकू येऊ लागला. स्वीटीने रितेशला सांगितले की, “आता तू खूप प्रसिद्ध झाला आहेस. तू राखी सावंतशी लग्न केले आहे, पण मला आशा आहे की तू मला विसरला नाहीस.” रितेश आणि यी बेल्जियमला ​​हॉट चॉकलेट प्यायला जायचे, असेही तिने सर्वांना सांगितले. सलमाननेही तिचे म्हणणे मान्य केले आणि सांगितले की, खरंतर स्वीटी रितेशकडे सेक्रेटरीच्या कामासाठी आली होती. त्याने नोकरी तर दिली नाही, पण नंतर ते एकमेकांना डेट करू लागले. (bigg boss 15 rakhi sawants husband riteshs ex girlfriend comes to meet him at weekend ka vaar item girl got biggest shocked)

रवीना टंडनने केला प्रँक
या प्रकारावर राखी खूप नाराज दिसली आणि तिने रितेशला हे सर्व काय आहे ते विचारले. रितेशही काही वेळ गप्प बसला पण नंतर तो म्हणाला की, तुम्ही मला माझ्या बेल्जियमच्या घराचा पत्ता सांग, मग मी विश्वास ठेवेन की तुम्ही बरोबर आहात. खरं तर हा रवीना टंडनने राखी सावंतसोबत खेळलेला प्रँक होता. रवीना तिच्या ‘अरण्यक’ या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या शोमध्ये आली होती. जेव्हा ती समोर आली, तेव्हा रितेश आणि राखी दोघेही तिला पाहून खूप खुश झाले.

रवीनाचा चाहता आहे रितेश
रवीना टंडनकडे पाहून रितेश म्हणाला, “मॅडम मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. हा आवाज तुमचा आहे, हे मला माहीत असते तर मी माझा पत्ता तुम्हाला स्वतःहून दिला असता आणि राखी सावंतच्या आधी तुम्ही मला भेटला असता, तर मी फक्त तुमचाच विचार केला असता.” या सगळ्याबद्दल सलमानचे काही वेगळेच म्हणणे होते. सलमानने म्हणाला की, “जेव्हा मी रितेशच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. मी खात्रीने सांगू शकतो की, त्याची आधी एक गर्लफ्रेंड नक्कीच असेल.” हे ऐकताच तिघे उपस्थित सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा